SPPU Admission sakal
एज्युकेशन जॉब्स

SPPU Admission : दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.ए. आणि बी.कॉम. अभ्यासक्रमांसाठी दूरस्थ अध्ययन प्रणालीद्वारे प्रवेश सुरू झाले आहेत. शैक्षणिक सत्र ऑगस्ट २०२४करिता प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.ए. आणि बी.कॉम. अभ्यासक्रमांसाठी दूरस्थ अध्ययन प्रणालीद्वारे प्रवेश सुरू झाले आहेत. शैक्षणिक सत्र ऑगस्ट २०२४करिता प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येतील. प्रशालेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी यासंबंधी पत्रक प्रसिद्ध केले आहे.

नियमितपणे महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्य नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेने उच्च शिक्षणाची दालने खुली झालेली आहेत. नोकरदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, दुर्गम भागातील नागरिक, व्यावसायिक आदी यासाठी अर्ज करू शकतात.

दूरस्थ अध्ययनची पदवी ही नियमित महाविद्यालयाच्या पदवीच्या समकक्ष असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केले आहे. हे दोन्ही अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजीतून उपलब्ध आहे. मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आदी विषयांत बी.ए.ची पदवी प्राप्त करता येईल. तर बी.कॉम. पदवीत व्यवसाय व्यवस्थापन, बॅंकिंग अॅन्ड फायनान्स, कॉस्ट अॅन्ड वर्क्स अकाउंटिंग, इन्शुरन्स ट्रान्सपोर्ट अॅन्ड टुरिझम या विषयांत ही पदवी प्राप्त करता येईल. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी जवळच्या महाविद्यालयातील अभ्यास केंद्राला भेट द्यावी.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज करण्याची अंतिम मुदत : ३० जुलै

महाविद्यालयांत प्रवेश अर्ज जमा करणे : १ ऑगस्ट

संकेतस्थळ : http://unipune.ac.in/SOL/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

स्वतःला देशभक्त म्हणवता? मग यातील कोणकोणते चित्रपट तुम्ही पाहिलेत?

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

SCROLL FOR NEXT