Admission to agriculture is also like engineering education student state govt  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Agriculture Admission : कृषीचेही प्रवेश अभियांत्रिकीप्रमाणे; अंमलबजावणीबाबत मात्र अस्पष्टता

कृषी महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांत बदल करताना ती अभियांत्रिकीप्रमाणे राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कृषी महाविद्यालयांच्या केंद्रीभूत प्रवेशप्रक्रियेच्या नियमांत बदल करताना ती अभियांत्रिकीप्रमाणे राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्यानंतर रिक्त जागांची माहिती मिळेल. त्याप्रमाणे पर्यायही निवडता येतील. यामुळे कृषीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होईल. महाविद्यालयांनाही अंतिम तारखेपर्यंत प्रवेश देता येईल.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील बैठकीनंतर सोशल मिडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. मात्र हा बदल नेमका कोणत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. राज्यात कृषीसाठी सध्या सीईटी सेल प्रवेशप्रक्रिया राबविते. यात विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात झाली असून सोमवारी (ता. ३१) अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल.

नोंदणी करतानाच विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयानुसार पसंतीक्रम भरून घेण्यात आले. त्यानुसार प्रत्येक फेरीसाठी निवड यादी प्रसिद्ध केली जाते. तर अभियांत्रिकी व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना रिक्त जागांनुसार प्रत्येक फेरीसाठी नव्याने पसंतीक्रम भरता येतात. आता ही पद्धत कृषीसाठी राबविली जाईल.

निर्णयाचे वैशिष्ट्ये

  • विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवणारी प्रवेश प्रक्रिया

  • राखीव जागांचा लाभही विद्यार्थ्यांना मिळणार

  • कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत

  • केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zubeen Garg Death : झुबीन यांच्यावर विषप्रयोग? व्यवस्थापक, आयोजकावर कटाचा आरोप

साप्ताहिक राशिभविष्य : (०५ ऑक्टोबर २०२५ ते ११ ऑक्टोबर २०२५)

Weekend Breakfast Recipe: वीकेंडला बनवा घरीच बनवा स्ट्रीट फूड स्टाइल वडापाव, सोपी आहे रेसिपी

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 ऑक्टोबर 2025

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

SCROLL FOR NEXT