CUET google
एज्युकेशन जॉब्स

CUET : अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश CUETद्वारे होणार ?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced परीक्षा घेतली जाते.

नमिता धुरी

मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेशांना सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा-अंडर ग्रॅज्युएट (CUET-UG) मध्ये विलीन करण्याच्या प्रस्तावावर काम करत आहे.

यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या चार विषयांसह तीन स्वतंत्र प्रवेश परीक्षांमध्ये बसण्याऐवजी एकाच प्रवेश परीक्षेला बसता येईल व त्या आधारावर स्वतंत्रपणे विविध विषयांच्या पुढील अभ्यासासाठी प्रवेश घेता येईल.

जगदीश कुमार म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० मध्ये "एक राष्ट्र, एक प्रवेश" ची संकल्पना आहे. असे झाल्यावर महाविद्यालयातील प्रवेशासाठी अनेक प्रवेश परीक्षांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होईल.

ते म्हणाले, “आपच्याकडे ३ प्रवेश परीक्षा आहेत- NEET, JEE Main आणि CUET आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या प्रवेश परीक्षांना बसतात. या सर्व परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित केल्या जातात, त्यामुळे अनेक विषयांच्या प्रवेशासाठी एकट्या CUET स्कोअरचा वापर का करू नये, असा प्रश्न पडतो.

कुमार म्हणाले, “शिक्षण मंत्रालय आणि यूजीसीने भागधारकांना तयार करण्यासाठी आधीच चर्चा सुरू केली आहे. परीक्षेच्या काही महिन्यांपूर्वी आम्ही अचानक काहीही जाहीर करू इच्छित नाही.”

जेईई मेन देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी घेण्यात येते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये प्रवेश घेण्यासाठी JEE Advanced परीक्षा घेतली जाते. तर, एमबीबीएस आणि बीडीएस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NEET आयोजित केली जाते आणि केंद्रीय विद्यापीठांमधील विविध UG आणि PG अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CUET आयोजित केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : सर्वसमावेशक कर्करोग धोरण तयार करण्याचे सरकारचे निर्देश

SCROLL FOR NEXT