SET Admit Card sakal
एज्युकेशन जॉब्स

SET Admit Card : ‘सेट’चे प्रवेशपत्र उपलब्ध ; परीक्षा सात एप्रिलला; सुमारे एक लाख परीक्षार्थी

प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांच्‍या लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहेत. सेट विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना त्यांच्‍या लॉगिनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध होईल. राज्यातील १७ शहरांत सात एप्रिलला परीक्षा होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोव्यासाठी सेट परीक्षा घेण्यात येते. आचारसंहितेमुळे परीक्षेबद्दल अनेक अफवा पसरल्या होत्या; पण आता अधिकृतपणे प्रवेशपत्र उपलब्ध झाल्याने सेटबाबत संभ्रम दूर झाला आहे. टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये त्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध होईल.

परीक्षेच्या सात दिवस आधीच विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षा केंद्र आणि इतर तपशील उपलब्ध होईल. रविवारी (ता. ७) सकाळी दहा ते दुपारी दीडदरम्यान परीक्षा होईल. जवळपास सर्वच विद्याशाखांतील पदव्युत्तर पदवी प्राप्त सर्वच विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असतात. मार्च २०२३ मध्ये झालेल्या सेटप्रमाणेच यंदाच्या ३९व्या सेटची रचना असेल.

प्रवेशपत्रासाठी : https://setexam.unipune.ac.in/

परीक्षा दृष्टिक्षेपात

  • एकूण विद्यार्थी : १,२८,२४३

  • शहरांची संख्या : १७

  • परीक्षा केंद्र : २९८

शासनातर्फे सेट परीक्षेचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता परीक्षेची तयारी करावी. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना कल्पना दिली आहे.

- डॉ. बी. पी. कापडणीस, समन्वयक, सेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT