Career in Dietitian esakal
एज्युकेशन जॉब्स

Career in Dietitian : बारावीनंतर ‘आहारतज्ज्ञ’ ठरतोय उत्तम पर्याय, अन्न विज्ञान, तंत्रज्ञान अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्याचा ओढा

Career in Dietitian : अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आजच्या काळात उदयोन्मुख क्षेत्र असून त्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्र आहे.

सकाळ वृत्तसेवा

Career in Dietitian : बदलत्या जीवनशैली आणि चुकीचे आहार सेवन यामुळे आरोग्याशी निगडित लठ्ठपणा, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजार उद्‍भवतात. अशा परिस्थितीत आहारतज्ज्ञांची मागणी वाढत आहे. हळुहळू लोकांमध्ये निरोगी जीवनशैली आणि आहाराबाबत जागरूकता वाढत आहे.

अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान हे आजच्या काळात उदयोन्मुख क्षेत्र असून त्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत असल्याचे चित्र आहे. बारावीनंतर अन्न तंत्रज्ञान आणि विज्ञान या विषयात करिअरची मोठी संधी त्यामुळे निर्माण होत आहे.

बारावी नंतर काय? हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतो. आज अनेक विद्यार्थी बारावीनंतर आहार या क्षेत्रात आपले करिअर घडवत आहेत. अन्न विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी, अन्न उत्पादनांच्या रसायनशास्त्र आणि जैवरसायनशास्त्राविषयी ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे.

या क्षेत्रात, खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेव्यतिरिक्त, त्यांच्या सुरक्षिततेबद्दल आणि पोषक तत्वांबद्दल देखील त्यांना चांगले ज्ञान असले पाहिजे. त्यासाठी देशातील विविध विद्यापीठांमध्ये अन्न तंत्रज्ञान आणि पात्रता अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि गृहविज्ञान या विषयांसह बारावी उत्तीर्ण केल्यास फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकता.

याशिवाय महाविद्यालयामध्ये होम सायन्स या नावाने अभ्यासक्रम आहे. त्यातही विद्यार्थिनींना प्रवेश घेता येतो. तांत्रिक पदवी अभ्यासक्रम केल्यावर केल्यानंतर, तुम्ही फूड केमिस्ट्री, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आणि इतर क्षेत्रात प्रगत पदवी देखील करू शकता. याशिवाय तुम्ही आहारशास्त्र आणि पोषण आणि फुड, पब्लिक हेल्थ सायन्स आणि सार्वजनिक आरोग्य पोषण मध्ये डिप्लोमा देखील करता येतो.

अशा आहेत संधी

  • फूड प्रोडक्शन मॅनेजर

  • फूड टेक्नोलॉजिस्ट

  • क्वालिटी मॅनेजर

  • न्यूट्रीशनल अँड सप्लिमेंट थेरपिस्ट

  • प्रोसेस डेव्हलमेंट सायन्टिस्ट

  • प्रोडक्ट रिसर्चर

  • फूड परचेजिंग मॅनेजर

  • रेग्युलेटरी अफेअर ऑफिसर

  • लॅबोरेटरी टेक्निशियन फूड रिसर्चर सायन्टिस्ट

  • डायटेशिअन

कोरोनानंतर आरोग्याच्या प्रश्‍न महत्‍वाचा ठरला आहे. त्यामुळे आहारशास्त्रात अनेक संधी असून येत्या काळात अनेक रोजगार आणि स्वयमरोजगार यात निर्माण करता येऊ शकतात. आहारशास्त्र अभ्यासक्रमातून शिकलेल्या अनेक गोष्टी दुसऱ्याच्या नव्हे तर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीनेही आवश्‍यक आहे. त्यामुळे त्यात उत्तम करीअर आणि चांगले आरोग्यही ठेवता येणे शक्य होईल.

डॉ. रश्‍मी काळे, फुड सायन्स ॲण्ड न्युट्रीशियन, एलएडी कॉलेज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT