Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : बारावीनंतर करिअरचे क्षेत्र निवडताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी

करिअरचे योग्य क्षेत्र निवडणे आणि त्यामध्ये यशस्वी होणे हे खूप महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : एक चांगला करिअर ऑप्शन निवडणे आणि त्यामध्ये यशस्वी होणे हे खूप महत्वाचे आहे. मात्र, सर्वांनाच हे जमते असे नाही. आता १० वी किंवा १२वीच्या बोर्ड परीक्षांचे उदाहरण घ्या. या परीक्षांसाठी विद्यार्थी खूप तयारी करतात, भरपूर अभ्यास करतात. कारण, या दोन महत्वाच्या परीक्षांनंतर त्यांच्या करिअरची खरी सुरूवात होणार असते.

त्यामुळे, १० वी किंवा १२ वी झाल्यानंतर तुम्ही योग्य करिअर ऑप्शन निवडणे हे फार महत्वाचे आहे. हा ऑप्शन निवडताना तुम्ही जर चुकलात तर मग तुम्हाला करिअरमध्ये अनेक अडचणींचा सामना करायला लागू शकतो.

मात्र, तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही. कारण आज आम्ही तुम्हाला १०वी किंवा १२ वी नंतर करिअरचे योग्य क्षेत्र निवडताना काय काळजी घ्यायची? त्याबद्दल सोप्या गोष्टी सांगणार आहोत.

विचार करून करिअरचे क्षेत्र निवडा

१२ वी झाली की विद्यार्थी त्यांना हवे असलेल्या करिअरची वाट निवडतात. परंतु, ही वाट निवडण्यापूर्वी तुम्हाला त्या क्षेत्राची आवड आहे का? तुम्ही निवडलेल्या करिअरच्या क्षेत्राला पुढे काय स्कोप आहे? या सगळ्याचा विचार करणे हे फार महत्वाचे आहे.

१२ वीची परीक्षा झाली की विद्यार्थ्यांना या संदर्भात विचार करण्यास पुरेसा वेळ असतो. त्यामुळे, या वेळेचा फायदा घ्या आणि तुम्हाला कोणता विषय आवडतो? तुम्हाला ज्या विषयात किंवा ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्याची माहिती घ्या, त्यात भविष्यात किती स्कोप आहे? याची चाचपणी करा आणि त्यानंतर योग्य निर्णय घ्या.

आवडत्या-नावडत्या विषयांची यादी करा

तुम्हाला जे विषय आवडतात त्याची एक लिस्ट तयार करा आणि जे विषय आवडत नाही त्याची सुद्धा एक यादी बनवा. जसे की, तुम्हाला आर्ट्सची आवड आहे का? तुम्हाला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंगची आवड आहे का? तुम्हाला मेडिकल क्षेत्राची आवड आहे का? या पद्धतीने तुमच्या आवडत्या आणि नावडत्या विषयांची यादी करा आणि त्यानुसार तुमच्या करिअरचे क्षेत्र निवडा.

गर्दीच्या मागे धावणे सोडा

अनेकदा काय होतं की मित्र-मैत्रिणी जे करिअरचे क्षेत्र निवडतात, त्यांच्याच मागे धावण्याचा काही जण प्रयत्न करतात, जे अत्यंत चुकीचे आणि घातक आहे. कधीकधी फॅमिलीतील एखाद्या सदस्याने एखाद्या क्षेत्राबद्दल सांगितले की, आपण त्यावर प्रभावित होऊन त्याने सांगितलेले करिअर निवडतो. मात्र, हे चुकीचे आहे.

प्रत्येकाचे करिअर हे वेगळे असू शकते. त्यामुळे, गर्दीच्या मागे धावू नका आणि तुम्हाला ज्या क्षेत्रात रूची आहे तेच क्षेत्र करिअरसाठी निवडा. तुमच्या मित्राने किंवा मैत्रिणीने ते क्षेत्र निवडले आहे म्हणून तुम्ही ही तेच निवडू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Pune News : दौंडमध्ये SRPF च्या ७१ व्या दीक्षांत संचलनात ३१६ नवप्रविष्ठांना कर्तव्यशपथ; आधुनिक युद्धतंत्राची तयारी सुरू!

Latest Marathi News Live Update : शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा, उच्च न्यायालयाचा आदेश

Google Search : रात्रीच्या वेळी मुली गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात? 2025 च्या धक्कादायक डेटामुळे जग हादरलं

Manchar News : मंचरमध्ये हुतात्मा बाबू गेनू प्राण ज्योतीचे जल्लोषात स्वागत; घोषणांनी दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज चौक!

SCROLL FOR NEXT