after 14 year education policy change 8th standard passing rule Sakal
एज्युकेशन जॉब्स

इयत्ता आठवीपर्यंत ढकलपास आता बंद; १४ वर्षांनंतर सरकारकडून धोरणात बदल

पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याचे बंधन

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची आता दरवर्षी परीक्षा होणार आहे. दरवर्षी शाळा स्तरावर परीक्षा होतेच, पण पहिली ते आठवीपर्यंत कोणालाही नापास करायचे नाही, असे धोरण ‘आरटीई’अंतर्गत २०१० पासून सुरू आहे. आता त्यात बदल करण्यात येणार असून पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षा पास व्हावीच लागेल, अन्यथा त्यांना नापास झाल्याने त्याच वर्गात बसावे लागणार आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ‘आरटीई’ ॲक्ट लागू करताना पहिली ते आठवीतील सर्वच विद्यार्थ्यांना पास करण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे २०१० पासून आतापर्यंत पहिली ते आठवीतील एकही विद्यार्थी नापास झाला नाही.

पण, पुढे जाऊन अनेक विद्यार्थी इयत्ता दहावी, बारावीत अभ्यासक्रमात पिछाडीवर राहिले आणि अनेकांनी मधूनच शाळा देखील सोडल्याची उदाहरणे समोर आली. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, त्यांना इंग्रजी, गणित, विज्ञान असे विषय विस्तृतपणे समजावेत या हेतूने आता इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाईल.

पण, २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून त्या वर्गातील विद्यार्थ्यांना शाळेच्या परीक्षेत पास व्हावेच लागणार आहे. नापास झालेल्या विद्यार्थ्याला आता यापुढे पुढच्या वर्गात जाता येणार नाही. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून प्रश्नपत्रिकांचा नमुना तयार करण्यात आला आहे. त्या धर्तीवर शाळांना प्रश्नपत्रिका काढाव्या लागणार आहेत.

वार्षिक परीक्षेनंतर ३० दिवसांत पुन्हा संधी

इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा पार पडल्यानंतर त्यात जे विद्यार्थी अनुत्तीर्ण तथा नापास होतील, त्यांना पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. एक महिन्यानंतर त्यांची पुन्हा एकदा शाळास्तरावर परीक्षा होईल. त्यावेळी जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील, त्यांना नव्या शैक्षणिक वर्षापासून पुढील वर्गात बसण्याची संधी मिळणार आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र पुन्हा त्याच वर्गात बसावे लागणार आहे, असा नवा बदल करण्यात आला आहे.

आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन बदलानुसार इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. दुसरी संधी देऊनही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होईपर्यंत त्याच वर्गात बसावे लागेल. आता या दोन वर्गातील विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याची पद्धत बंद केली जाणार आहे.

- शोभा खंदारे, सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT