entrance exam esakal
एज्युकेशन जॉब्स

Ph.D. Entrance Test : कृषी विद्यापीठातील पीएच.डी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा २९ ऑक्टोबर रोजी

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध विद्याशाखांमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येईल.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - महाराष्ट्र कृषी विद्यापीठ परीक्षा मंडळातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये पीएच.डी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘आचार्य पदवी अभ्यासक्रम सामाईक प्रवेश परीक्षा २०२३’ राज्यातील सहा केंद्रांवर २९ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध विद्याशाखांमध्ये पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना २३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

संबंधित विद्याशाखेचे पदव्युत्तर विद्यार्थी, तसेच २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची अंतिम सत्र परीक्षा देणारे विद्यार्थी पात्र राहणार आहेत. प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या ‘http://www.mcaer.org’ संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाइन बॅकिंगद्वारे ९ ते २४ ऑगस्टपर्यंत स्वीकारले जाईल, असे परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे.

परीक्षेसाठी संभाव्य पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची तात्पुरती यादी ३१ ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना त्यांची ‘परीक्षा प्रवेश पत्र’ १७ ऑक्टोबरपासून संबंधित संकेतस्थळावरून प्रिंट काढून घेण्यासाठी उपलब्ध राहतील.

सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल ८ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. परीक्षेच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यास संबंधित संकेतस्थळावर अधिसूचित करण्यात येईल, असे परीक्षा मंडळाने सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५५२८५१९/२५५२८११९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

Bihar Laborer Killed in Sangli : मित्रानेच काढला काटा! जुन्या धामणीत नदीकाठी बिहारी मजुराचा धारदार शस्त्राने चिरला गळा; सांगलीत 72 तासांत पाचवा खून

Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

SCROLL FOR NEXT