Young professionals and skilled workers adapting to blue-collar careers amid rapid AI-driven changes in the global job market.
esakal
Why Gen Z Is Turning Towards Blue-Collar Jobs : सध्याच्या एआयच्या युगात व्हाईट-कॉलर नोकऱ्यांमध्ये घट आणि टाळेबंदीच्या संभाव्यतेमुळे त्रस्त कर्मचारी आता ब्लू-कॉलर नोकऱ्यांकडे वळत आहेत. एकीकडे कर्मचाऱ्यांना व्हाईट-कॉलर नोकऱ्यांमध्ये अनिश्चितता जाणवत आहे, तर दुसरीकडे, ब्लू-कॉलर उद्योगांमध्ये कामगारांची मोठी कमतरता आहे.
परिणामी, जलद प्रगतीच्या संधी देखील आहेत. तसेच या ठिकाणी एआयचा वापरही अल्प असल्याने कामाच्या संधी भरपूर आहेत. ब्लू-कॉलर नोकऱ्यांना व्हाईट-कॉलर नोकऱ्यांपेक्षा चांगले जीवन संतुलन प्रदान करणारे मानले जाते.
या नोकऱ्या सामान्यतः ऑफिस डेस्कऐवजी फिल्डवर, फॅक्टरी, वर्कशॉप किंवा बांधकाम साइटवर केल्या जातात. यामध्ये फूड डिलिव्हरी बॉय, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, कारपेंटर, ऑटो मेकॅनिक आणि क्रेन ऑपरेटर सारख्या नोकऱ्यांचा समावेश आहे.
असेही दिसून येत आहेत की, जेन-झी डेस्क जॉब आणि एआयचा प्रभाव असेल अशा ऑफिसमधील कामाच्या नोकऱ्या टाळू इच्छित आहेत. म्हणूनच ते ब्लू-कॉलर जॉबमध्ये करिअरच्या संधी शोधत आहेत. तथापि, काही लोक त्यांच्या पदवी आणि अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठीही ब्लू-कॉलर करिअर निवडत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.