Recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

AAI Recruitment 2021: परीक्षा न देता नोकरी, एक लाख रुपये पगार

नामदेव कुंभार

AAI Recruitment 2021 : नोकरीच्या शोधात असाल आणि तुम्हाला गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी असेल तर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (airport authority of india) भरती निघाली आहे. वरिष्ठ सहाय्यक या पदासाठी अर्ज मागण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार aai.aero या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करु शकतात. वरिष्ठ सहाय्यक पदाच्या 29 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अखेरची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवाराने लवकरात लवकर अर्ज करुन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. https://www.aai.aero/sites/default/files/examdashboard_advertisement/Deptt.%20Exam.pdf यावरुन तुम्हाला पदभरतीसंदर्भात सविस्तर माहिती मिळेल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 30 जून 2021 पर्यंत 50 वर्ष असायला हवं, अशी अट घालण्यात आली आहे.

कोणत्या पदावर किती जागा अन् पगार काय?

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन) - 14 पदे (पगार, 36 हजार ते एक लाख 10 हजार रुपये)

वरिष्ठ सहाय्यक (वित्त) - 6 पदे, (पगार, 36 हजार ते एक लाख 10 हजार रुपये)

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) - 9 पदे, (पगार, 36 हजार ते एक लाख 10 हजार रुपये)

पात्रता काय?

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – एलएमव्ही (LMV) परवानासह पदवीधर. उमेदवाराचा व्यवस्थापनाचा डिप्लोमा हवा.

वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – B.Com सह तीन ते सहा महिन्यांचं संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स)- इलेक्ट्रॉनिक्स/ दूरसंचार/ रेडिओ अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT