Job esakal
एज्युकेशन जॉब्स

Amazon कडून नोकऱ्यांचा पाऊस, तब्बल 1,10,000 लोकांना देणार जॉब

सकाऴ वृत्तसेवा

देशातील एकूण 35 शहरांमध्ये कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, कस्टमर केअर सर्व्हिस आणि ऑपरेशन क्षेत्रात भरती केली जाणार आहे.

- शिल्पा गुजर

जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत चांगली बातमी आहे. अ‍ॅमेझॉन इंडियाने (Amazon) सणासुदीच्या हंगामापूर्वी भारतात नोकऱ्यांचा पेटारा उघडला आहे. अ‍ॅमेझॉन भारतात 1,10,000 लोकांना नोकरी देण्याच्या तयारीत आहे. देशातील एकूण 35 शहरांमध्ये कॉर्पोरेट, तंत्रज्ञान, कस्टमर केअर सर्व्हिस आणि ऑपरेशन क्षेत्रात भरती केली जाणार आहे.

Job

अ‍ॅमेझॉनने सणासुदीच्या हंगामापूर्वी आपल्या ऑपरेशन नेटवर्कमध्ये 1,10,000 हून अधिक हंगामी नोकऱ्यांच्या (seasonal job) संधी निर्माण केल्या आहेत. यात मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, लखनौ आणि चेन्नई सारख्या शहरांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्यांचा समावेश आहे.

job Opportunities

या नवीन नोकऱ्या 8,000 नोकऱ्यांव्यतिरिक्त आहेत, ज्याची घोषणा नुकतीच अ‍ॅमेझॉनने केली होती. कंपनीने अलीकडेच म्हटले होते की ते यावर्षी 8,000 पदे भरणार आहेत. या 8,000 नोकऱ्यांव्यतिरिक्त 2025 पर्यंत देशभरात 10 लाख नवीन नोकरीच्या संधी निर्माण करण्याच्या तयारी असल्याचे अ‍ॅमेझॉनने म्हटले आहे.

Jobs

यापैकी बहुतेक नवीन कर्मचारी अ‍ॅमेझॉन नेटवर्कमध्ये सामील झाले आहेत आणि ग्राहकांना ऑर्डर, पॅक, कुरिअर करणे यासारख्या कामात मदत करतील. नवीन अपॉइंटमेंटमध्ये काही व्हर्च्युअल ग्राहक सेवा मॉडेल आहे, ज्या घरून कामाची सुविधा मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT