Indian Army Gallery
एज्युकेशन जॉब्स

भारतीय लष्कराने सुरू केली 'TGC-134' प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया!

भारतीय लष्कराने सुरू केली TGC-134 अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया!

श्रीनिवास दुध्याल

भारतीय लष्कराने तांत्रिक पदवी अभ्यासक्रम (TGC-134) मध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.

सोलापूर : भारतीय लष्कराने (Indian Army) टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स (Technical Graduate Course) (TGC-134) मध्ये प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. अविवाहित पुरुष इंजिनिअर ग्रॅज्युएट उमेदवार या अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना भारतीय लष्कराच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in द्वारे अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, या अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे. अंतिम तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भारतीय लष्कराने सांगितले की, देहराडूनच्या (Dehradun) मिलिटरी ऍकॅडमी (Military Academy) (IMA) येथे जानेवारी 2022 मध्ये सुरू होणाऱ्या 134 व्या तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी (TGC-134) ही भरती आयोजित केली आहे.

शैक्षणिक पात्रता

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेले किंवा अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात असलेले, तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी अर्ज करणारे उमेदवार देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. तथापि, या उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना सर्व सेमिस्टर/वर्षाच्या गुणपत्रिका भारतीय सैन्य अकादमी (IMA) प्रशिक्षण संस्थेकडे उत्तीर्ण होण्याच्या पुराव्यासह सादर कराव्या लागतील. याशिवाय, 1 जानेवारी 2022 पर्यंत उमेदवारांचे वय 20 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे.

या अभ्यासक्रमाद्वारे एकूण 40 जागा भरल्या जातील. आणि ज्या प्रवाहात नेमणुका होतील त्यापैकी वर्कशॉप टेक्‍नॉलॉजी, इंडस्ट्रियल /इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्‍चरिंग / इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग एंड एमजीटी, प्रॉडक्‍शन, फायबर ऑप्टिक्‍स, इलेक्‍ट्रॉनिक्‍स एंड इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन, एवियोनिक्‍स, एरोनॉटिकल / एयरोस्पेस, मायक्रो इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि मायक्रोवेव्ह, इलेक्‍ट्रॉनिक्‍स एंड कम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलॉजी, कॉम्प्युटर विज्ञान आणि इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर प्रौद्योगिकी / एमएससी, कॉम्प्युटर सायन्स, टेलिकम्युनिकेशन, इलेक्‍ट्रिकल / इलेक्‍ट्रिकल आणि इलेक्‍ट्रॉनिक्‍स, मेकॅनिकल, आर्किटेक्‍चर आणि सिव्हिल / बिल्डिंग कन्स्ट्रक्‍शन टेक्‍नॉलॉजी स्ट्रीम समाविष्ट आहेत. फॉर्म भरताना हे लक्षात ठेवावे, की अर्जाचा नमुना अधिसूचनेनुसार भरला जावा, कारण कोणतीही माहिती अपूर्ण राहिल्यास अर्ज देखील नाकारला जाऊ शकतो. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dams Water Level : पुणेकरांसाठी मोठी बातमी! चारही धरणे 100% भरली; पण आज 'या' भागात पाणीच नाही

Farmer Accident Scheme: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अपघात सुरक्षा योजनेत आता संपूर्ण कुटुंबाला संरक्षण, 2031 पर्यंत मुदतवाढ

Mumbai Local Train Viral Video : माथेफिरुने रोखली लोकल ट्रेन, धाडसी प्रवाशामुळे टळली मोठी दुर्घटना; रुळांवरचा थरार कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Gold Rate Today: RBI च्या निर्णयानंतर ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदा सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 10 ग्रॅमचा ताजा भाव किती?

Kolhapur Flood: हिप्परगी, आलमट्टीत पाणी साठ्याचे निकष धाब्यावर; ‘आंदोलन अंकुश’च्या पाहणीत स्पष्ट, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महापुराचे संकट

SCROLL FOR NEXT