online application form sakal
एज्युकेशन जॉब्स

HSC Exam: बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी शनिवारपासून भरा अर्ज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी शनिवारपासून (ता.१) विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी शनिवारपासून (ता.१) विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे.

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी शनिवारपासून (ता.१) विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत ऑनलाइन पद्धतीने सरल डेटाबेसवरून भरायची असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज १ ते २१ ऑक्टोबर दरम्यान नियमित शुल्कासह भरता येणार आहेत. तर व्यवसाय अभ्यासक्रम शाखांचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विष, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांना २२  ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरायची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी अर्ज त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत भरावी. व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या नियमित विद्यार्थ्यांची माहिती सरल डेटामध्ये नसल्याने या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीने ऑनलाइनच भरावेत. नियमित शुल्काने अर्ज भरायच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे ओक यांनी स्पष्ट केले आहे.

तपशील : नियमित शुल्कासह अर्ज करण्याचा कालावधी

- शास्त्र, कला व वाणिज्य शाखांचे नियमित विद्यार्थी : १ ते २१ ऑक्टोबर

- व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, आयटीआय घेणारे विद्यार्थी : २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जे नव्हतं घडायला, तेच झालं! भारताच्या T20 World Cup मोहिमेला धक्का, स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार; अनकॅप्ड खेळाडूचा आधार

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

SCROLL FOR NEXT