Apply today for Sakal India Foundation Scholarship education pune sakal
एज्युकेशन जॉब्स

Sakal India Foundation Scholarship 2023 : सकाळ इंडिया फाउंडेशन शिष्यवृत्तीसाठी आजच करा अर्ज

सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सकाळ इंडिया फाउंडेशनच्या वतीने उच्च शिक्षण घेण्यासाठी बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती देण्यात येते. फाउंडेशनचे हे ६४ वे वर्ष असून, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ पासून एक लाख रूपयांच्या बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचप्रमाणे भारतात पीएचडी करण्यासाठी किंवा परदेशी पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रूपयांच्या अशा ५० शिष्यवृत्त्या देण्यात येतील.

अर्ज कोणी करावा?

परदेशी विद्यापीठांकडून किंवा संशोधन संस्थेकडून किमान एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी (२०२३-२४) प्रवेश दिल्याबद्दलचे लेखी पत्र असलेले. भारतातील विद्यापीठांमध्ये किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पीएच. डी.च्या प्रवेश दिल्याबद्दलचे २०२१ किंवा त्या पूर्वीचे विद्यापीठाचे किंवा राष्ट्रीय संशोधन संस्थेचे लेखी पत्र प्राप्त झाले असेल, फक्त असेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीकरीता पात्र समजले जातील.

नियम काय?

विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परतफेड २ वर्षात किंवा त्या आधी करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्र व्यवसायाचे पदव्युत्तर किंवा पीएच. डी. करणाऱ्या विद्यार्थ्यास रुपये दहा हजार इतकी रक्कम परतफेड न करण्याच्या अटीवर मंजूर केली जाईल.

अर्ज कसा करावा ?

पात्र विद्यार्थ्यांनी www.sakalindiafoundation.com या संकेतस्थळावर अर्ज करावा

अर्जाची मुदत

- १५ मे ते १५ जून २०२३

अधिक माहितीसाठी संपर्क :

सकाळ इंडिया फाऊंडेशन सकाळ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ, पुणे ४११००२.

संपर्क क्रमांक : ०२० ६६०३५९३५

ई-मेल : contactus@sakalindiafoundation.org / sakalindiafoundation@esakal.com

पोलिसांच्या पाल्यासाठी केळकर शिष्यवृत्ती

'सकाळ इंडिया फाऊंडेशन' ने फाऊंडेशन च्या सुवर्ण महोत्सवी वर्षांपासून कै. लक्ष्मण विष्णू केळकर आणि कै. उषा लक्ष्मण केळकर यांच्या नावाने पोलिसांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्त्या सुरु केल्या आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी देखील शिष्यवृत्ती सुरु केली आहे. बिनव्याजी कर्जाऊ शिष्यवृत्तीसाठी काही जागा ह्या मुलांसाठी राखीव ठेवल्या आहेत. तरी अशा

विद्यार्थ्यांनी, ज्यांना परदेशातील विद्यापीठातील प्रवेश पत्र प्राप्त झाले आहे, अशा विद्यार्थ्यांनी ‘‘केळकर शिष्यवृत्तीसाठी’’ अर्ज करावा, असे आवाहन सकाळ इंडिया फाऊंडेशन तर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

Latest Marathi News Live Update : विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT