'बीपीसीएल'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 21 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज Canva
एज्युकेशन जॉब्स

'बीपीसीएल'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 21 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

'बीपीसीएल'मध्ये अप्रेंटिस पदांची भरती! 21 सप्टेंबरपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) (भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, बीपीसीएल) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

सोलापूर : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited - BPCL) ने अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी (Jobs) अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी अशी एकूण 87 पदांची भरती केली जाईल. इच्छुक आणि पात्र उमेदवार राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजनेच्या (National Apprenticeship Training Scheme - NATS) अधिकृत साइट mhrdnats.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात घ्यावे की, या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 सप्टेंबर 2021 पर्यंत आहे. शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

रिक्त पदांचा तपशील

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पदवीधर प्रशिक्षणार्थीच्या 42 आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थीच्या 45 पदांची भरती केली जाईल. बीपीसीएलच्या मते, 1973 च्या कायद्यानुसार प्रशिक्षणार्थीचा कालावधी एक वर्षाचा असेल.

जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

पदवीधर प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी असणे आवश्‍यक आहे, ज्यामध्ये मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ / संस्थेकडून 6.3 सीजीपीए असणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी राज्य तंत्र शिक्षण मंडळ / मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकीमध्ये प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण असावे.

वयोमर्यादा

पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षांच्या दरम्यान असावे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.

अशी होईल निवड प्रक्रिया

बीपीसीएलने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पात्रता परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी सामान्य एससी/ एसटी/ ओबीसी/ पीडब्ल्यूडी श्रेणीनुसार तयार केली जाईल. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT