Online-Admission sakal
एज्युकेशन जॉब्स

Army MNS Admission : बारावीनंतर मुलींना लष्करात नोकरी करण्याची मिळणार संधी

सैन्यदलाच्या वतीने ‘मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस’ (एमएनएस) अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय विभागात अधिकारी म्हणून काम करण्याची संधी आता मुलींना मिळणार आहे. सैन्यदलाच्या वतीने ‘मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस’ (एमएनएस) अंतर्गत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबतच्या सूचना सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आल्या आहेत.

एमएनएस प्रवेश प्रक्रिये अंतर्गत मुलींना बारावीनंतर लष्करात नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी लेखी परीक्षा व मुलाखती अशा स्वरूपात उमेदवारांची निवड केली जाणार आहे. याकरिता १७ ते २५ वर्षे अशी उमेदवारांसाठी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

तसेच बारावी वैज्ञानिक शाखेतून उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. ही प्रवेश बारावी तसेच ‘नीट’ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलींना देता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना देशातील सहा लष्करी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये चार वर्षांचे बीएस्सी नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

त्यामध्ये पुण्यातील सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालयाचा (एएफएमसी) ही समावेश आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर हे उमेदवार सशस्त्र दल वैद्यकीय सेवेच्या (एएफएमएस) नर्सिंग अधिकारी म्हणून सेवा बजावणार आहेत.

प्रवेश प्रक्रिये अंतर्गत एकूण २२० जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एमएनएस प्रवेशाबाबत अधिक माहिती तसेच अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना www.joinindianarmy.nic.in या सैन्यदलाच्या अधिकृत संकेतस्थळाचा वापर करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Ganesh Visarjan : अहिल्यानगरमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; तरुणाचा मृत्यू, आमदार संग्राम जगताप यांचे ठिय्या आंदोलन

आजचे पंचांग 24 सप्टेंबर 2026! प्रदोषामुळे खास दिवस; वाचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

Jharkhand Dhuska Recipe: एकदा खाल तर पोहे-उपमाही विसराल! असा बनवा बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ झारखंडी धुस्का

आजचे राशिभविष्य - 24 सप्टेंबर 2026

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT