Journey-to-english-language
Journey-to-english-language 
एज्युकेशन जॉब्स

इंग्रजी शिका : Journey to English Language

शैलेश बर्गे

एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटले किंवा समजले, की ती गोष्ट कशी करायची हे समजणे तुलनेने सोपे जाते आणि मग ती न करण्याची कारणेसुद्धा द्यावी लागत नाहीत. (कारण आपल्याला एखादी गोष्ट करायचीच असेल तर आपण कोणतेही कारण सांगत नाही. कारण सांगत असू तर ती गोष्ट आपल्याला करायचीच नसते. बरोबर ना? असो)
यश मिळवायचे असते तेव्हा आपण आधी पक्के केलेले असते, की आपल्याला नक्की काय मिळवायचे आहे. आता आपले उद्दिष्ट नक्कीच पक्के झाले असून ते आहे, ‘To communicate in English like a confident native speaker."

या उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या मार्गावरील milestones आता आपण पाहू या. 
तुमच्या मातृभाषेचेच उदाहरण घेऊन पाहू या. तुमची मातृभाषा मराठी असेल तर आठवा बरे, तुम्ही अ-अननस, आ-आगगाडी आधी शिकलात की त्या आधी मराठी भाषेतील बरंच काही शिकलेला होता? 

माझ्या अंदाजाने तुमची मराठी भाषेची आगगाडी जेव्हा सुरू होत होती, त्या वेळी तुम्हाला मराठीतील, तुमच्या मातृभाषेतील शेकडो शब्द अर्थासहित, विविध उपसर्गासहित, अनेक व्याकरणाच्या नियमासहित माहिती होते. बरोबर ना? कारण एकच! कारण तुम्ही तुमच्या मातृभाषेची सुरुवात लिहिण्यापासून नाही, बोलण्यापासून सुद्धा नाही, तर ती ऐकण्यापासून केली होती!  

‘माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृताचेहि पैजासी जिंके’ अशी महती असलेली मराठी भाषा तुम्ही बोलू शकत असाल, तर जगातील कोणतीही भाषा सहज शिकू शकाल आणि बोलूही शकाल; यावर सर्वांत प्रथम विश्‍वास ठेवा. 

पुढच्या लेखात आपल्या इंग्लिश भाषेच्या प्रवासाचा पहिलावहिला आणि महत्त्वाचा Milestone, जो आहे Listening, याकडे वाटचाल करूया.

1) कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या भाषेतील भाषिक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असते. इतर भाषांप्रमाणे इंग्लिश भाषेमधील LSRW; Listening, Speaking, Reading, and Writing ही कौशल्ये आत्मसात केल्यानंतर आपल्याला सर्वसमावेशक असे संवादाचे कौशल्य आत्मसात करणे सहज शक्य होऊ शकते. हेच आहेत आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठीच्या मार्गावरील milestones!

2) आठवा बरं! इंग्लिश भाषेची आणि तुमची झालेली पहिली भेट! आठवतेय का? माझ्याप्रमाणे किती जणांची भेट ‘A’ for Apple आणि ‘B’ for Ball अशी झाली आहे कोणास ठाऊक! एखाद्याची अजिबात ओळख नसताना उगाचच एकतर्फी ओळख वाढविण्याचा प्रयत्न केल्यासारखा वाटतो ना! 

3) Skills अर्थात कौशल्य म्हणताना आपण LSRW हा क्रम लक्षात घेत आहोत, खरे तर कोणतीही भाषा शिकताना हाच क्रम अगदी नैसर्गिक आणि सहजप्रवृत्तीचा वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT