Higher Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

परदेशी शिकताना... : दोस्ती हाऊस : अमेरिकेत उच्चशिक्षणाच्या संधीसाठी...

वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील अमेरिकी वकिलातीच्या आवारात एक सुसज्ज ग्रंथालय व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे दालन आहे.

सकाळ वृत्तसेवा

वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील अमेरिकी वकिलातीच्या आवारात एक सुसज्ज ग्रंथालय व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे दालन आहे.

वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील अमेरिकी वकिलातीच्या आवारात एक सुसज्ज ग्रंथालय व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे दालन आहे. तुम्ही कधी भेट दिली आहे का या भव्य वास्तूला? तुम्हाला माहीत आहे का, येथे अमेरिकेतील शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन मिळू शकते? तुम्हाला अमेरिकेबद्दल इतर माहिती हवी असल्यास तीही मिळेल. अमेरिकी समाज व राजकारण समजून घ्यायचे असल्यास तुम्हाला येथे मिळतील उत्तम साहित्य व सिनेमे. या ‘दोस्ती हाऊस’ जरूर भेट द्या!!

विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचे करिअर विकसित करण्यासाठी इतर देशांचे भारतात कार्यरत असलेले वाणिज्य दूतावास अथवा वकिलात (कॉन्सुलेट) प्रयत्नशील असतात. संबंधित देशात शिक्षणासाठी जाण्यास मदत करण्यापासून त्या देशाच्या संस्कृतीची ओळख करून देण्यापर्यंतची अनेक कामे या वकिलाती करतात. त्यापैकीच एक आहे ‘दोस्ती हाऊस’ हा मुंबई येथील वांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील अमेरिकी वकिलातीचा विशेष विभाग.

‘दोस्ती हाऊस’ ही विद्यार्थ्यांसाठीची मुंबईतील ‘अमेरिकन स्पेस’ आहे. अमेरिकेतर्फे जगभरातील १४० देशांमध्ये सुमारे सहाशे ठिकाणी ‘ओपन अॅक्सेस सांस्कृतिक केंद्रे’ सुरू केली आहेत. अमेरिकन स्पेसेस या सहयोगी प्रयोगशाळा असून, येथे लोक एकत्र येऊन नवनवीन प्रकल्प विकसित करू शकतात, कल्पनांची देवाण-घेवाण करू शकतात व त्यातून परस्परांतील सहकार्य वाढवू शकतात.

‘दोस्ती हाऊस’मध्ये सातत्याने चर्चासत्रे व चित्रपट महोत्सव आयोजित केले जातात, संगणक आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये उच्चशिक्षण घेण्यासाठीच्या कोणत्या संधी आहेत, याबद्दलची अद्ययावत माहिती दिली जाते. मुंबईमधील अमेरिकेच्या वाणिज्य वकिलातीच्या आवारात असलेल्या ‘दोस्ती हाऊस’मध्ये सर्वांना खुला व मोफत प्रवेश आहे. आपले ओळखपत्र बरोबर ठेवून आपण येथे सकाळी ९ ते संध्याकाळी पाचपर्यंत वेगवेगळ्या सोयींचा आनंद घेऊ शकता.

येथे अभ्यागतांना अमेरिकेतील उच्चशिक्षण, राजकारण, उद्योग, अर्थव्यवस्था, इतिहास, मानवी हक्क, साहित्य, कायदा, पर्यावरण व संस्कृती आदी विषयांवर मोठ्या संख्येने असलेली पुस्तके, मासिके, डीव्हीडी पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. ‘दोस्ती हाऊस’ या विषयांवरील सुमारे १५ हजार पुस्तके, १ हजार ५०० डीव्हीडी, सरकारी प्रकाशने, अमेरिकन मासिके, दैनिके आणि इ-लायब्ररीचा ऑनलाइन अॅक्सेस आदी सुविधा वाचकांना पुरवते. ही सुविधा सोमवार ते शनिवार सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत उपलब्ध असते. ही सुविधा मिळविण्यासाठी अभ्यागतांना केवळ सरकारतर्फे दिले गेलेले स्वतःचे ओळखपत्र व निवासाचा पुरावा जवळ बाळगावा लागतो. सदस्यत्वासाठी १६ वर्षे पूर्ण केले असणे आवश्यक असून, सुविधांसाठी नाममात्र शुल्क आकारले जाते. यामध्ये ग्रंथालयातील पुस्तके, दोस्ती हाऊसमध्ये विनाअडथळा प्रवेश व सर्व कार्यक्रमांचे निमंत्रण या सुविधा मिळतात.

अशाप्रकारे अमेरिकेमध्ये उच्च शिक्षणासाठी जाण्याची इच्छा असणाऱ्या व अमेरिकेची संस्कृती, इतिहास, कायदे आदींबद्दल अद्ययावत माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्यांची ‘दोस्ती हाऊस’तर्फे दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ अवश्य घ्यावा. त्यामुळे अमेरिकेत उच्च शिक्षणाचे स्वप्न सत्यात उतरणे अधिक सोपे होईल.

संपर्क - DostiHouse@state.gov

संकेतस्थळ - https://in.usembassy.gov/education-culture/american-spaces/dostihouse-mumbai/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT