Pune University sakal
एज्युकेशन जॉब्स

खगोलभौतिकी एम. एससी. शिक्षण घ्यायची सुवर्णसंधी उपलब्ध

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

सम्राट कदम

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

पुणे - खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घ्यायचे असेल तर एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) यांच्या वतीने एम.एस्सी खगोलभौतिकी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रवेश अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अंतिम मुदत १७ जुलैपर्यंत आहे.

अभ्यासक्रमाचे हे दुसरे वर्ष असून, मागील वर्षी १९ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील विद्यार्थीही सहभागी होऊ शकता. संशोधनाबरोबरच खगोलीय डेटा ॲनॅलिसिस, मॅनेजमेंट आदी क्षेत्रात विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध होत आहे. निवड झालेले विद्यार्थी अभ्यासक्रमांच्या दोन वर्षाच्या कालावधीसाठी एक हजार रुपयांच्या मासिक शिकवणी शुल्काच्या परतफेडीसाठी पात्र असतील. लायगो, स्क्वेअर किलोमीटर अरे आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये भारताचा सहभाग आहे. यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळासाठी हे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पात्रता -

- बी.एस्सी. (द्वितीय वर्षापर्यंत गणित आवश्यक) किंवा अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेत पदवी पूर्ण

- पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के आवश्यक

- जॉईन्ड एन्ट्रान्स स्क्रिनींग टेस्ट (जेस्ट २०२२) च्या गुणांच्या आधारे निवड

प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठीचे संकेतस्थळ -

https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx

खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संशोधन करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना संशोधनासाठी योग्य संधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसादही उत्तम आहे.

- डॉ. संदेश जाडकर, विभागप्रमुख, भौतिकशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: ठाणे-बेलापूर मार्गावर चार रात्री वाहतूक बंद, काय असतील पर्यायी मार्ग?

Abhishek Sharma: अभिषेक शर्माने पाकिस्तानची धुलाई केली, अन् एक-दोन नव्हे तर ६ विक्रम रचले! युवराज-कोहलीच्या खास क्लबमध्ये थेट एन्ट्री

Akola Water Crisis : अकोल्यातील संभाव्य पाणीटंचाईवर प्रशासनाची तयारी काटेपूर्णा प्रकल्पातील मर्यादित साठ्याच्या पार्श्वभूमीवर पाच पर्यायी उपाययोजनांना गती

ChatGPT सांगणार कपडे तुमच्यावर कसे दिसतील? खरेदीआधीच पाहा लूक; असे वापरा 'Virtual Try-On' हे भन्नाट फिचर...

Latest Marathi News Live Update : विमान प्रवासादरम्यान प्रवाशाची प्रकृती गंभीर; डॉ. भागवत कराड यांनी तत्काळ धाव घेत दिली वैद्यकीय मदत

SCROLL FOR NEXT