bank-of-india Gallery
एज्युकेशन जॉब्स

बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी ! 'ही' आहेत रिक्त पदे

बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीची उत्तम संधी! 'ही' आहेत रिक्त पदे

श्रीनिवास दुध्याल

बॅंकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. बॅंक ऑफ इंडियाने सपोर्ट स्टाफ पदांसाठी अर्ज मागविले आहेत.

सोलापूर : बॅंकेत नोकरीचे (Jobs) स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे. बॅंक ऑफ इंडियाने (Bank of India) सपोर्ट स्टाफ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 21 पदांची भरती केली जाईल. बॅंकेने या रिक्त जागा कराराच्या आधारावर काढल्या आहेत. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना या पदांमध्ये स्वारस्य आहे आणि अर्ज करायचा आहे, ते बॅंकेच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे. यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. बॅंकेने विविध मंडळांसाठी या रिक्त जागा काढल्या आहेत. याअंतर्गत मैनपुरी, कन्नौज आणि फर्रुखाबाद येथे सपोर्ट स्टाफ पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

सपोर्ट स्टाफ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे BSW/ BA/ B.Com ची पदवी असणे आवश्‍यक आहे. यासह संगणकाचे ज्ञान असले पाहिजे. उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल 45 वर्षे असावे. याशिवाय भरतीशी संबंधित तपशिलांसाठी उमेदवार बॅंक ऑफ इंडियाची अधिकृत साइट पाहू शकतात.

वयोमर्यादा

बॅंक ऑफ इंडियामध्ये जॉब इच्छुकांनी लक्षात घ्यावे, की फॅकल्टी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 25 ते 63 वर्षांच्या दरम्यान असावे. कार्यालय सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे असावे. या व्यतिरिक्त वॉचमन कम गार्डनर पदासाठी अर्ज करणारे उमेदवार 18 ते 63 वर्षांच्या दरम्यान असावेत. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार सवलत दिली जाईल.

अशी होईल निवड प्रक्रिया

उमेदवारांची लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत आणि सादरीकरणाच्या आधारावर सपोर्ट स्टाफच्या पदांसाठी निवड केली जाईल. याशिवाय लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान आणि संगणक क्षमतेशी संबंधित प्रश्न विचारले जातील. त्याचबरोबर मुलाखतीत उमेदवारांकडून नेतृत्व, संभाषण कौशल्य, समस्या सोडवणे आणि इतर प्रश्न विचारले जातील. या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT