Shivaji University esakal
एज्युकेशन जॉब्स

Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठात 'या' विषयाचा पेपर फुटला; तातडीने बदलली प्रश्नपत्रिका

घडलेल्या प्रकाराची चौकशी करून परीक्षा प्रमाद समितीच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल.

सकाळ डिजिटल टीम

पेपर फुटल्याचे लक्षात येतात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तातडीने प्रश्नपत्रिका बदलली.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) उन्हाळी सत्र परीक्षेतील ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर क्रमांक चार काल (बुधवार) फुटला. पेपर फुटल्याचे लक्षात येतात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तातडीने प्रश्नपत्रिका बदलली.

घडलेल्या प्रकाराची चौकशी करून परीक्षा प्रमाद समितीच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल. बीकॉम अभ्यासक्रमातील सहाव्या सेमिस्टरची परीक्षा (BCom Semester Examination) सध्या सुरू आहे. काल ॲडव्हान्स अकाउंटन्सी विषयाचा चौथा पेपर होता. दुपारी अडीच वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, हा पेपर फुटल्याचे परीक्षा विभागाच्या लक्षात आले.

त्यांनी तातडीने प्रश्नपत्रिका बदलून एसआरपीडीच्या माध्यमातून महाविद्यालयात नवीन प्रश्नपत्रिका पाठवली. त्यामुळे तीन वाजता पेपर सुरू झाला. त्यानंतर परीक्षा विभागाने बैठक घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. या सगळ्या प्रकरणाची परीक्षा प्रमाण समिती चौकशी करून पुढील कार्यवाही करेल, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT