BMC Education Department Rakshabandhan holiday canceled in schools sakal
एज्युकेशन जॉब्स

Raksha Bandhan 2022 : शाळांमध्ये रक्षाबंधनची सुटी रद्द!

पालिकेच्या शिक्षण विभागाच्या फतव्याने नाराजी

सकाळ वृत्तसेवा

कांदिवली : मुंबई महापालिकेने पालिका, खासगी व विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची रक्षाबंधनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबतचे पत्रच सर्व शाळांना पाठवल्याने शिक्षक, विद्यार्थ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. मुंबई महापालिकेतील शिक्षण विभागाचे अधिकारी राजेश कंकाळ यांनी ४ ऑगस्ट रोजी याबाबतचे पत्रक जाहीर केले.

त्यात सुट्यांची संख्या जास्त होते, हे कारण देऊन दरवर्षी दिली जाणारी रक्षाबंधनाची सुट्टी रद्द केली असल्याचे सांगितले आहे. ऑगस्ट महिन्यात एकूण पाच सुट्या असतात. परंतु पालिका शाळेतील शिक्षकांना नवीन परिपत्रकानुसार चार सुट्यांमध्ये समाधान मानावे लागणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन आणि १ मे या तीन दिवशी शाळेत हजर राहून राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. रक्षाबंधनची सुटी रद्द करण्याचे परिपत्रक तातडीने रद्द करून सुटी जाहीर करावी, अन्यथा शिक्षणाधिकारी कार्यालयात आंदोलन करणार, असा इशारा शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT