Bogus transfer certificates of college made in Mumbai admission in Ulhasnagar college Crime against 12 students Sakal
एज्युकेशन जॉब्स

Mumbai : मुंबईतील कॉलेजचे बोगस ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवून उल्हासनगरातील कॉलेजमध्ये ऍडमिशन; 12 विद्यार्थ्यांवर गुन्हा

चक्क मुंबई मधील कॉलेजचे बोगस ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवणाऱ्या 12 विद्यार्थ्यांनी उल्हासनगरातील कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याचा पर्दाफाश मुंबई विद्यापीठाच्या उप कुलसचिवांनी केला आहे.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - चक्क मुंबई मधील कॉलेजचे बोगस ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवणाऱ्या 12 विद्यार्थ्यांनी उल्हासनगरातील कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्याचा पर्दाफाश मुंबई विद्यापीठाच्या उप कुलसचिवांनी केला आहे.त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून या 12 विद्यार्थ्यांवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात फसवेगिरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॅम्प नंबर 4 मध्ये मौर्या नगरीच्या रोडवर विशेषतः शैक्षणिक आणि क्रिडा क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे एस.एस.टी कॉलेज आहे.2018 साली 12 विद्यार्थ्यांनी विक्रोळी येथील संदेश कॉलेजच्या नावाने बोगस ट्रान्सफर सर्टिफिकेट बनवून एस.एस.टी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले होते.ही घटना मुंबई विद्यापीठाच्या निदर्शनास आल्यावर गुरुवारी 28 तारखेला मुंबई विद्यापीठाचे उप कुलसचिव अशोक घुले यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार या 12 विद्यार्थ्यांवर कलम 420,456,471,34 अंतर्गत फसवेगिरी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अपात्र विदयार्थ्यांनी बोगस कागदपत्रांचा वापर करुन ऍडमिशन मिळविल्याचे निष्पन्न झाल्यावर संबंधीत एस.एस.टी कॉलेजने तकार नोंदविणे अपेक्षित होते असे अशोक घुले यांनी फिर्यादित नमूद केले आहे.पण एस.एस.टी कॉलेजने असे का केले नाही ?असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विक्रम गौड करत आहेत.

या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता या विद्यार्थ्यांचे पत्ते निष्पन्न होत नसले तरी लवकरच त्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यात येणार असल्याचे पडवळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT