मुंबई : ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना पुस्तके (book for students) मिळत नसल्याने त्यांचे शिक्षण संकटात सापडते, अशा स्थितीत राज्यातील प्रत्येक विद्यार्थांना (students) पुस्तके पुरविण्याची जबाबदारी असलेल्या बालभारतीने (balbharati) मागील दहा वर्षात तब्बल सालात 5 हजार 633.6 मेट्रिक टन म्हणजेच 6 कोटी 40 लाख 2हजार 61रुपयांची पुस्तके थेट रद्दीत (waste book selling) विकली आहेत. ही धक्कादायक माहिती बालभारतीने माहिती आधिकारात (RTI) दिली आहे.
राज्यातील मुलांच्या हातात न जाणारी ही पुस्तके एक दोन नव्हे तर तब्बल 6 कोटी 40 लाख रुपयांची असल्याने बालभारतीच्या या हजारो टन पुस्तकाची विक्री केली जात असल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती मिळवली आहे. 2012 पासून आजपर्यंत दर वर्षी हजारो मेट्रिक टन पुस्तके रद्दीत विक्री करून टाकलेले असून त्यात 2012-13 ते 2018-19 या सालात तब्बल सालात 5 हजार 633.6 मेट्रिक टन म्हणजेच 6 कोटी 40 लाख 2हजार 61रुपयांची पुस्तके थेट रद्दीत विकली आहेत.
ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचली नाही? रद्दीत विकण्यासाठी प्रत्येक वर्षी जास्तीची पुस्तके छापली जातात का? या रद्दीत विकलेल्या पुस्तकांची किंमत साडेसहा कोटी रुपये आहे तर ही पुस्तके छापण्यासाठी, ट्रांसपोर्टेशन चार्जेस व लोडिंग अनलोडिंग हा सर्व खर्च मिळून ती बालभारतीला किती रुपयात पडली असेल, असा सवाल महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनचे (मेस्टा) संस्थापक अध्यक्ष डॉ. संजयराव तायडे-पाटील यांनी केला आहे. यात प्रचंड मोठ्या प्रमाणात बालभारती आणि संबधित कंत्राटदार यांच्या मोठ्या प्रमाणात साटेलोटे झालेले असल्याचा संशय व्यक्त करत याची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी तायडे-पाटील यांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून बालभारतीमध्ये प्रकाशक व अध्यक्ष यांच्या संगनमताने विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची रद्दीत विक्री केली जात आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना पुस्तके मिळत नाहीत व दुसरीकडे रद्दीत विकले जातात. दुर्गम भागात तर पुस्तके पोहचत पण नाहीत. तर कोट्यावधीची पुस्तके दरवर्षीच्या दरापेक्षा अर्ध्या दरातच रद्दीत विकून अधिकारी मोकळे होतात, असा आरोपही त्यांनी केला आहे.
"मागील पाच वर्षात आम्ही छपाईसाठी एक लाख टन कागद वापटला.या काळात अनेक अभ्यासक्रमाची पुनर्रचना झाली. काही अभ्यासक्रम बदलले, यामुळे पहिली ते बारावीपर्यंतची अनेक पुस्तके जी स्टॉक होती, तयार होती आम्हाला रद्दीत काढावी लागतात. शिवाय ती आम्ही केवळ मिलकडे देतो, इतर कंत्राटदार यांना देत नाही. "
- विवेक गोसावी, संचालक बालभारती
वर्षे.....वजन मेट्रिक टन. रक्कम रुपये
२०१२-२०१३. १५९४.७४५...७२,७६,९७७.००
२०१६-२०१७. २०९८.४०५...२,६२,१९,६००.००
२०१७-२०१८. १०४०.०७०...१,५६, ७१, २५४.७३
२०१८-२०१९. ९००.३८०...१,४८, ३४, २२९.९०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.