Deepak Kesarkar Maharashtra Education Corporation Pune esakal
एज्युकेशन जॉब्स

Board Exams : दहावी, बारावी परीक्षांवरील बहिष्कार स्थगित; शिक्षणमंत्री, सचिवांशी चर्चेनंतर निघाला तोडगा

पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी महाराष्ट्रात सर्व शिक्षण संस्थांनी जाहिराती दिल्या पाहिजेत.

सकाळ डिजिटल टीम

शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती उठवली असल्याने शिक्षकेतर कर्मचारी भरती विनाविलंब करण्याचे शिक्षणमंत्री यांनी मान्य केले.

मलकापूर : इयत्ता बारावी व दहावी बोर्ड परीक्षांवर (12th and 10th Board Exams) महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे यांनी घातलेला बहिष्कार तात्पुरता स्थगित केला आहे. महामंडळाच्या कार्यकारिणीच्या सभेत परीक्षांवर बहिष्कार घालण्याचे ठरले होते; परंतु शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) व शिक्षण सचिव शिक्षण संचालक यांची (ता. १२) बालभवन मुंबई येथे शिक्षण संस्था महामंडळाची बैठक आयोजित केली होती.

बैठकीत काही मागण्या मान्य केल्या, तर काही मागण्या लवकर पूर्ण करू, असे आश्वासन दिल्यानंतर परीक्षांवर बहिष्कार मागे घेण्यात आला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात (Ashokrao Thorat) यांनी दिली.

बैठकीत पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षक भरती करण्यासाठी महाराष्ट्रात सर्व शिक्षण संस्थांनी जाहिराती दिल्या पाहिजेत व उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे सर्व वैधता तपासून भरती करण्याबाबत शिक्षण मंत्रालय अंतर्गत बैठक घेणार. शिक्षकेतर कर्मचारी भरतीबाबत उच्च न्यायालय मुंबई यांनी स्थगिती उठवली असल्याने शिक्षकेतर कर्मचारी भरती विनाविलंब करण्याचे शिक्षणमंत्री यांनी मान्य केले. संच मान्यता व अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत सचिव व शिक्षणमंत्री यांनी संच मान्यतेचे कॅम्प त्वरित घेऊन प्रलंबित संच मान्यता पूर्ण कराव्यात, असे सांगितले.

वेतनेतर अनुदान गेल्या वर्षाचे वेतनेतर अनुदान ज्यांना मिळाले नाही ते दिले जाईल व या वर्षासाठी मागील वर्षासह २७० कोटी वेतनेतर अनुदान ३१ मार्चपूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून, वित्त विभागाकडे प्रस्ताव आताच पाठवला आहे. तो लवकरच मंजूर होईल व ३१ मार्चपूर्वी वेतनेतर अनुदान दिले जाईल.

अशा आहेत मागण्या

  • शासनाने नवीन शाळा (इंग्रजी, मराठी) वाटप धोरण आल्याशिवाय नवीन शाळा वाटप बंद करावे.

  • नवीन शैक्षणिक धोरण राबवण्या आधी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी निर्धारणाचे निकष नव्याने ठरविण्यात यावेत.

  • गुणवत्तापूर्ण शिक्षण व विद्यार्थी केंद्रित धोरण ठरवण्यात यावे.

  • शिक्षणावर होणारा खर्च मर्यादित न ठेवता राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६ टक्के करण्यात यावा.

  • कंत्राटी, घड्याळी तासिकानुसार शिक्षक, प्राध्यापक भरती पूर्णपणे बंद करण्यात यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT