BSF esakal
एज्युकेशन जॉब्स

BSFने जारी केली कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना! 92 हजार वेतन

BSF ने जारी केली कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना! 92 हजारांपर्यंत वेतन

सकाळ वृत्तसेवा

BSF ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर गट C पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.

सोलापूर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force - BSF) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर गट C पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक असलेले आणि पात्र उमेदवार या पदांसाठी सीमा सुरक्षा दल (BSF) rectt.bsf.gov.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2021 आहे.

बीएसएफने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एकूण रिक्त पदांची संख्या 72 आहे. रिक्त पदांपैकी ASI चे 1 पद, HC ची 6 पदे आणि हवालदाराची (लाइनमन, जनरेटर ऑपरेटर आदी) 65 पदे रिक्त आहेत. ASI च्या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना सातव्या CPC नुसार 29,200 रुपये ते 92,300 रुपये वेतनश्रेणी दिली जाईल. त्याच वेळी HC च्या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 25,500 रुपये वेतनश्रेणी दिली जाईल. कॉन्स्टेबल पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना 21,700 ते 69,100 रुपये वेतन दिले जाईल.

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. वयोमर्यादेबद्दल संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पाहावी.

इच्छुक असलेले आणि पात्र उमेदवार या पदांसाठी सीमा सुरक्षा दल (BSF) rectt.bsf.gov.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 डिसेंबर 2021 आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बीएसएफमध्ये काम करणारे उमेदवार आदींना अर्ज शुल्कात सूट देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT