तुम्ही दहावी पास आहात? तुमच्यासाठी 'येथे' आहेत बंपर सरकारी नोकऱ्या! Sakal
एज्युकेशन जॉब्स

तुम्ही दहावी पास आहात? तुमच्यासाठी 'येथे' आहेत बंपर सरकारी नोकऱ्या!

तुम्ही दहावी पास आहात? तुमच्यासाठी 'येथे' आहेत बंपर सरकारी नोकऱ्या!

सकाळ वृत्तसेवा

उमेदवार 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात.

तुम्ही दहावी पास आहात, तर तुमच्यासाठी सरकारी नोकऱ्यांची (Government Jobs) संधी चालून आली आहे. हेडक्वार्टर दक्षिणी कमान, पुणे (Pune)) यांनी कनिष्ठ हिंदी अनुवादकासह (Junior Hindi Translator) विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया (Recruitment) सुरू आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट ambala.cantt.gov.in वर 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. एकूण 97 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. उमेदवार या पदांसाठी विहित अंतिम तारखेपर्यंत अर्ज करू शकतात. (Bumper jobs are available for tenth pass candidates)

अशी आहे रिक्त पदांची संख्या

  • उपविभागीय अधिकारी (II) : 89 पदे

  • कनिष्ठ हिंदी अनुवादक : 7 पदे

  • हिंदी टायपिस्ट : 1 पद

जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी, उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी किंवा इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. तर उपविभागीय अधिकारी आणि हिंदी टंकलेखक या पदांसाठी उमेदवाराला कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी उमेदवार जारी केलेली अधिकृत अधिसूचना https://ambala.cantt.gov.in/wp-content/uploads/sites/40/2021/12/detailed-advt-021221-eng.pdf पाहू शकतात.

जाणून घ्या वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षे यादरम्यान असावे. उमेदवाराचे वय 15 जानेवारी 2022 पासून मोजले जाईल. त्याच वेळी, उच्च वयोमर्यादेत ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत दिली जाणार आहे.

अशी राहील निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. लेखी परीक्षेची तारीख आणि प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइटद्वारे दिले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udgir News : उदगीर-लातूर महामार्गावर भीषण अपघात, दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू

Global Warming and Polar Ice Caps : अंटार्क्टिकातील हिमनद्या; पृथ्वीच्या संतुलनाचा मौन संरक्षक

Marathi Theatre BTS stories : चारशे तीस सव्वीस ऐंशी

International Women’s Day : कवेत अंबर घेण्यासाठी

Indian Cricket Pitch Analysis : खेळपट्टीवरील मातीची करामत!

SCROLL FOR NEXT