career in journalism do you want to become journalist all you need to know Sakal
एज्युकेशन जॉब्स

तुम्हाला पत्रकार व्हायचंय?

समाजात घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेऊन वार्तांकन करण्याचे काम पत्रकार करत असतो. पत्रकार हा समाजाचा कान-नाक-डोळा असतो.

सकाळ वृत्तसेवा

- प्रा. विजय नवले

समाजात घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेऊन वार्तांकन करण्याचे काम पत्रकार करत असतो. पत्रकार हा समाजाचा कान-नाक-डोळा असतो. वृत्तपत्र, रेडिओ, टेलिव्हिजन आणि आता सोशल मीडिया ही पत्रकारितेची प्रमुख माध्यमे आहेत. समाजातील स्पंदनांना भिडणारा पत्रकार होणं हा माझ्या जीवनाचा मार्ग आहे, असे वाटणारे पत्रकारितेची पदवी घेऊन त्यातील करिअर करण्याचा विचार करू शकतात. बीजे म्हणजेच बॅचलर ऑफ जर्नालिजम ही पत्रकारितेची पदवी आहे.

पात्रता

कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पत्रकारितेच्या पदवी कोर्ससाठी पात्र असतो. राज्यस्तरावरील कोणतीही सीईटी या प्रवेशासाठी नाही. काही संस्था त्यांच्या स्तरावर प्रवेश परीक्षा घेऊ शकतात. बारावीनंतर तीन वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांमध्ये अभ्यासक्रम उपलब्ध आहे.

कुणी विचार करावा?

  • सामाजिक घटना आणि त्यांचा अन्वयार्थ लावण्याची अधिक आवड आहे त्यांनी.

  • ज्यांची सामाजिक निरीक्षणे उत्तम आहेत त्यांनी.

  • श्रवण, वाचन, लेखन आणि वक्तृत्व ही कौशल्ये बऱ्यापैकी विकसित आहेत त्यांनी.

  • कोणतेही काम पूर्ण करण्यासाठीचे धाडस, चिकाटी, उत्साह ज्यांच्या अंगात आहे त्यांनी.

अभ्यासक्रमातील विषय

पत्रकारितेची ओळख, भाषाज्ञान, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, प्रशासन यांची तोंडओळख, पत्रकारितेचा इतिहास आणि वाटचाल, बातमीचा शोध, वार्तालेखन, वार्तांकन, संपादन, वृत्तनिवेदन ही कौशल्ये,

प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल मीडिया यांचा सखोल अभ्यास, पत्रकारितेशी संबंधित कायदे, फोटोजर्नालिजम, क्राईम रिपोर्टिंग, सांस्कृतिक-कला-क्रीडा वार्तांकन, राजकीय विश्लेषण, मास मीडियाचा वापर, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, तसेच पत्रकारितेशी संबंधित संस्था यांचा अभ्यास, अग्रलेख, संपादकीय, स्फूट, विश्लेषणात्मक लेखन, जाहिरातशास्त्र यांचा सखोल अभ्यास पत्रकारितेमध्ये शिकविला जातो.

अभ्यासक्रमाचे स्वरूप

या अभ्यासक्रमात नामवंत तज्ज्ञ अध्यापनासाठी येतात. वर्गातील शिक्षणासह प्रात्यक्षिके, असाइनमेंट्स, स्थानभेटी, व्यक्तीभेटी, लेखनाचे प्रत्यक्ष काम, फिल्ड व्हिजिटपासून वार्तांकनापर्यंत कामासाठीच्या इंटर्नशिप संधी, विविध क्षेत्रांमधील प्रतिभावंतांची गेस्ट लेक्चर्स या माध्यमांतून अध्ययन करता येते. अभ्यासकेंद्रात समृद्ध लायब्ररी उपलब्ध असते. गटचर्चा, विविध सत्रे, तांत्रिकी कामांसाठी प्रकल्प भेटी आयोजित केलेल्या असतात.

मोठ्या संधी

पत्रकार, वृत्तनिवेदक, प्रूफरीडर, स्तंभ लेखक, कंटेंट रायटर, टेक्निकल रायटर, सहसंपादक, व्यवस्थापक, उपसंपादक, संपादक अशा अनेक संधी मिळतात. समाजात या पदांना मोठा सन्मान असतो. ग्लॅमर असते.

आवड असणाऱ्यांसाठी हे क्षेत्र खऱ्या अर्थाने निरंतर आनंदाचा झरा आहे. लेखक, वक्ते, अभ्यासक, संशोधक, सामाजिक नेतृत्व, राजकारणी पदाधिकारी इथपर्यंत अनेक आगळ्या-वेगळ्या संधी चालून येतात.

हे मात्र संबंधितांच्या कौशल्यांवर अवलंबून असते. वृत्तसमूहाच्या वतीने किंवा स्वतंत्रपणे यू-ट्यूबसारख्या माध्यमातून पत्रकारिता करणे सध्याचा ट्रेंड आहे. विश्लेषणात्मक चर्चा घडवून आणणे, सर्व्हे करणे, सामाजिक आशयाचे संशोधन करणे, स्वतः विश्लेषक बनणे आदी अनेक कामांमध्ये हल्लीचे पत्रकारितेतील तज्ज्ञ जोरदार काम करताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Maratha Reservation : काळजी घ्या, सगळं ठरल्याप्रमाणं होईल! जरांगेंना भेटताच विखे पाटलांनी दिली सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती

Marathwada Rain Forecast : मराठवाड्यात आजपासून वादळासह पावसाची शक्यता, तापमानात एक ते दोन अंशाने वाढ

Numerology: 'या' मूलांकाच्या मुली सासरी घेऊन येतात अखंड समृद्धी! पाहा कोणत्या मूलांकाची मुलगी सासरसाठी ठरते लक्ष्मी?

SCROLL FOR NEXT