career opportunities in Archeology sector for students in kolhapur  
एज्युकेशन जॉब्स

इतिहास संशोधनाची आवड असेल तर हे क्षेत्र तुमच्या करियरसाठी बेस्ट

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राम जन्मभूमीच्या वादानंतर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था चर्चेत आली. या निर्णयात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या रिपोर्टला श्रेय दिले जाते. ऐतिहासिक, संस्कृतीक महत्व असलेल्या विविध स्थळांचा शोध, तिथे उपलब्ध असलेले साक्षपुरावे याबद्दल अधिकची माहिती गोळा करणे हे काम भारतीय पुरातत्त्व खात्याचे असते. तुम्ही या फिल्डमध्ये विशेष तज्ञ म्हणून काम करू शकता. चला तर एक करिअर म्हणून याकडे कसे पहावे आणि त्याबद्दल माहिती आपण पाहुयात..

पुरातत्व विभाग म्हणजे काय 

पुरातत्व विभाग आर्किऑलॉजी याचं काम इतिहास शोधणे किंवा तो संरक्षित ठेवणे हे असते. ऐतिहासिक वस्तूंना किंवा साक्षपुरावे जपून ठेवून त्यांचं संग्रहालय तयारक करणे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक खजिन्यांचा शोध घेणे, त्यांचे संरक्षण करणे, म्युझियम, आर्टगॅलरी या सर्व क्षेत्रांचा आर्किऑलॉजी क्षेत्रात समावेश होतो. करिअर म्हणून तुम्ही याकडे पाहू शकता.

शैक्षणिक पात्रता काय असावी 

आर्किऑलॉजी मध्ये ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पीएचडी पर्यंतचे कोर्स उपलब्ध आहेत. बारावीपर्यंत तुम्ही इतिहास या विषयांत ग्रॅज्युएशन पूर्ण करून या विषयात पदवी घेउ शकता. ग्रॅज्युएशन लेव्हलपर्यंत अनेक संस्था किंवा कॉलेज पातळीवरील पीजी डिप्लोमा असतो. याव्यतरिक्त म्युझियोलॉजीमध्येही अनेक कोर्स उपलब्ध आहेत. 

नोकरी कशी मिळवावी

याचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या शिक्षणसंस्था, अनुसंधान, उत्खनन, संग्रहालय इत्यादी क्षेत्रांमध्येमध्ये तुम्ही करिअरचा पर्याय म्हणून पाहू शकता. या कोर्स करण्यासाठी नवी दिल्लीमध्ये असलेले भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग किंवा राज्यांमध्ये असलेले याच्या काही शाखा केंद्र यामध्ये सुद्धा तुम्ही जॉब करू शकता.

पगार किती मिळतो 

मॅनेजमेंटचा अभ्यास करणाऱ्या शिक्षणसंस्था, अनुसंधान, उत्खनन, संग्रहालय इत्यादी क्षेत्रांमध्येमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतात. राष्ट्रीय आणि राज्या पातळीवरील संग्रालय आर्टगॅलरीमध्येही तुम्ही जॉब करु शकता. या ठिकाणी 50 हजार रुपये पर्यंतचा पगार किंवा परतावा मिळवता येतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT