Sir jj school of art sakal
एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही फाईन आर्टमधील भारतातील अग्रणीय संस्था ब्रिटिश काळात १८५७मध्ये सर जमशेदजी जीजू भाय यांच्या भरघोस आर्थिक सहाय्यातून मुंबई येथे सुरू झाली.

सकाळ वृत्तसेवा

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही फाईन आर्टमधील भारतातील अग्रणीय संस्था ब्रिटिश काळात १८५७मध्ये सर जमशेदजी जीजू भाय यांच्या भरघोस आर्थिक सहाय्यातून मुंबई येथे सुरू झाली.

- सविता भोळे

सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट ही फाईन आर्टमधील भारतातील अग्रणीय संस्था ब्रिटिश काळात १८५७मध्ये सर जमशेदजी जीजू भाय यांच्या भरघोस आर्थिक सहाय्यातून मुंबई येथे सुरू झाली. सुरुवातीला फक्त ड्रॉइंग क्लासेसपासून सुरू झालेल्या या संस्थेमध्ये सध्या ड्रॉइंग अँड पेंटिंग, स्कप्लचर अँड मॉडेलिंग, म्युरल पोर्ट्रेट, प्रिंट मेकिंग, आर्ट्स अँड क्राफ्टस्, इंटेरिअर डेकोरेशन, मेटल वर्क, टेक्सटाईल, आर्ट टीचर ट्रेनिंग असे विविध विभाग कार्यरत आहेत.

संस्थेने देशाला वासुदेव गायतोंडे ,अकबर पद्मसी, तय्यब मेहता, जयराम पटेल, प्रभाकर बर्वे, प्रभाकर कोलते असे कलाक्षेत्रात क्रांती घडवून आणणारे व जगभरातील कलाक्षेत्रावर आपला ठसा उमटविणारे कलाकार दिले. फक्त कलाक्षेत्रातच नाही, तर प्रत्येक सृजनशील क्षेत्रात संस्थेने आपली पाळेममुळे व विस्तार वाढविलेला बघायला मिळतो.

संस्थेतर्फे कलाक्षेत्रातील विविध अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिप्लोमा व हॉबी कोर्सेस राबविले जातात.

‘जे जे’मधील महत्त्वाचे कोर्सेस

अ) बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स (BFA)

  • कालावधी : 4 वर्षे

  • पात्रता : 12 वी उत्तीर्ण

  • प्रवेश परीक्षा : MH-AAC-CET

  • हा कोर्स 1) पेंटिंग, 2) इंटेरियर डेकोरेशन, 3) टेक्सटाईल डिझाईन, 4) स्कल्पचर, 5) सिरॅमिक, 6) मेटल वर्क या विषयांमध्ये राबविला जातो.

ब) मास्टर ऑफ फाईन आर्ट्स (MFA)

  • कालावधी : 2 वर्षे

  • पात्रता : BFA

  • प्रवेश परीक्षा : नाही.

मेरिट बेसिस व त्यानंतर इंटरव्ह्यू यावर प्रवेश मिळतो.

  • हा कोर्स : 1) ग्राफिक्स, 2) पेंटिंग, 3) इंटेरियर डेकोरेशन, 4) पोर्ट्रेट, 5) स्कल्पचर, 6) टेक्सटाईल, 7) सिरॅमिक, 8) मेटल वर्क या विषयांकरता उपलब्ध आहे.

क) आर्ट टीचर डिप्लोमा (ATD)

  • कालावधी : 2 वर्षे

  • पात्रता : 12 वी+इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा

  • प्रवेश परीक्षा : नाही

मेरीट बेसिसवर प्रवेश मिळतो.

ड) डिप्लोमा इन स्कल्पचर अँड मॉडेलिंग

  • कालावधी : 4 वर्षे

  • पात्रता : फाउंडेशन कोर्स

  • प्रवेश परीक्षा : नाही

इ) डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन

  • कालावधी :1 वर्ष

  • पात्रता : डिप्लोमा/ डिग्री इन ड्रॉइंग अँड पेंटिंग/ स्कल्पचर अँड मॉडेलिंग अप्लाइड आर्ट

  • प्रवेश परीक्षा : नाही

ई) आर्ट मास्टर सर्टिफिकेट

  • कालावधी : 1 वर्ष

  • पात्रता : ATD+min 3yrs अनुभव

  • प्रवेश परीक्षा : नाही

फ) हॉबी कोर्सेस

  • कालावधी : 6 महिने

  • पात्रता : 1 दहावी + वयो ज्येष्ठता

  • प्रवेश परीक्षा : नाही

  • हे कोर्सेस : 1) पेंटिंग, 2) पोर्ट्रेट पेंटिंग, 3) प्रिंट मेकिंग, 4) लँडस्केप पेंटिंग, 5) सिरामिक आणि 6) मेटल या विषयांमध्ये उपलब्ध आहेत.

हॉबी कोर्सेस विशेषतः जे करिअर म्हणून या क्षेत्राकडे वळू शकले नाहीत, पण ज्यांना यात आवड आहे अशा प्रौढ व्यक्तींसाठी उपलब्ध आहेत या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी दहावी पास हा निकष असला तरी गुणांपेक्षा वयोजेष्ठता बघून प्रवेश दिला जातो. मात्र, कोर्सला 75 टक्के उपस्थितीची अट आहे. आठवड्यातून दोन दिवस यासाठी वर्ग घेतले जातात.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकेतस्थळ : www.sirjjschoolofart.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT