Career  sakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips: करिअरमध्ये यश मिळवायचंय? मग या गोष्टी जरूर ठेवा लक्षात

कशात करिअर करायचा हा गोंधळ झालाय? टेन्शन घेऊ नका, या टिप्स करा फॉलो

Aishwarya Musale

एखाद्या क्षेत्रात करिअर करायचं म्हंटलं आर त्यासाठी त्या क्षेत्रात आवड असणं महत्त्वाचं असतं. मात्र नुसती आवड असून फायदा नाही. कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी स्वतःमध्ये गरजेनुसार आणि वेळेनुसार काही बदल करणं आवश्यक असतं.

चांगल्या परफॉर्मेंसची शर्यत आणि बोर्डाच्या परीक्षेत गुण मिळवण्यासाठी विद्यार्थ्याला किती मेहनत करावी लागते, याचं फळ तेव्हाच मिळेल जेव्हा योग्य करिअरचा मार्ग निवडाल, पण ते कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे. चला, आज आम्ही तुम्हाला अशाच महत्त्वाच्या टिप्सबद्दल सांगत आहोत, ज्या तुम्हाला उत्तम करिअर पर्याय निवडण्यात मदत करू शकतात.

विचार करा आणि रिसर्च करा

12वी नंतर करिअर निवडण्याआधी तुमच्या आवडीवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला सर्वात जास्त आवडणाऱ्या विषयाचा विचार करा. तुम्ही विज्ञान, वाणिज्य किंवा ह्यूमेनिटीज घेऊ शकता पण एक विषय असा असावा ज्याचा तुम्ही स्वतः अभ्यास कराल, तो एक विषय शोधा आणि माहिती गोळा करा. प्रथम त्या विषयाचा विचार करा आणि नंतर भविष्यात त्या ऑप्शनचा स्कोप बघा आणि रिसर्च करा.

सल्ला देखील आवश्यक आहे

जर तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयात करिअर करण्याचा विचार करत असाल. त्या विषयात पुढे जाण्यापूर्वी, तुमचे पालक, मित्र, शेजारील सुशिक्षित लोक आणि तुमच्या शिक्षकांशी बोला. त्यांचा सल्ला घेऊ शकतो. तुमच्या मनातल्या काही शंका दूर करा आणि मगच करिअर निवडा.

कोर्स ते नोकरीपर्यंत मार्केट रिसर्च करा

करिअर निवडण्यापूर्वी मार्केट रिसर्च हा एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, जसे की कुठे शिकता येईल, किती फी आकारली जाते, त्या कोर्सनंतर नोकरीचे पर्याय काय आणि कुठे आहेत, भविष्यात किती स्कोप आहे इ.

आवडी-निवडींची यादी बनवा

तुम्हाला आवडणाऱ्या आणि न आवडणाऱ्या गोष्टींची यादी बनवा. उदाहरण- तुम्हाला कोणते विषय जास्त आवडतात, तुम्हाला आर्ट्समध्ये रस आहे का, तुम्ही साहसी आहात का, तुम्हाला कॉम्प्युटर आणि प्रोग्रामिंगमध्ये इंटरेस्ट आहे का इ. तुमच्या आवडी-निवडीनुसार स्वतःसाठी योग्य करिअर निवडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : मनोज जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी पुन्हा परवानगी नाकारली

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT