cbse exam esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE Admit Card 2021: 10-12 वी टर्म परीक्षा प्रवेशपत्र 'असं' करा डाऊनलोड

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीनं दहावी आणि बारावीच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी प्रवेशपत्र (CBSE Admit Card 2021) जाहीर करण्यात आली आहे. नवीन शिक्षण धोरणानुसार यंदा प्रथमचं सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन सत्रात (term exam) घेण्यात येत आहेत. मात्र हे प्रवेशपत्र डाऊनलोड कसे करावे हे जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा...

वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचं प्रवेशपत्र उलपब्ध होईल. तर, खासगी विद्यार्थ्यांना सीबीएसईच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र उपलब्ध होईल. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे रोल नंबर देखील जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रावर रोल नंबर, परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ, परीक्षेसंदर्भातील सर्व सूचना उपलब्ध होणार आहेत. त्यानुसार सीबीएसईकडून दहावी बारावीच्या टर्म 1 च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सीबीएसईच्या cbse.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध होतील.

मायनर विषय परीक्षा

इयत्ता 10 वीची टर्म I मायनर विषय परीक्षा 17 नोव्हेंबर रोजी पेंटिंग पेपरसह सुरू होईल आणि इयत्ता 12 वी टर्म 1 ची मायनर विषयांची परीक्षा 16 नोव्हेंबर सुरु होईल. दहावीची मेजर परीक्षा 30 नोव्हेंबर तर बारावीची मेजर विषयांची परीक्षा 1 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे.

सीबीएसईने विद्यार्थ्यांना नोटीसद्वारे परीक्षा केंद्र बदलण्याची परवानगी देण्यात आल्याचं सांगितलं आहे. बोर्डाच्या निदर्शनास आल्यानुसार अनेक विद्यार्थी त्यांची शाळा आहे त्या ठिकाणी नाहीत, अशा स्थितीत परीक्षेचे शहर बदलण्याची सुविधा विद्यार्थ्यांना दिली जाईल. सीबीएसईनं विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेशी कधी संपर्क साधू शकतात आणि परीक्षा केंद्र बदलण्याची विनंती करू शकतात यांसदर्भात सविस्तर माहिती देणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT