cbse assessment framework for science math and English for class 6 to 10 launched Marathi article 
एज्युकेशन जॉब्स

CBSE सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षापध्दत बदलणार; नवी असेसमेंट फ्रेमवर्क लॉन्च

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची परीङा पध्दत आणि आभ्यासक्रमामध्ये अमुलाग्र बगल करण्याचा निर्णय घेतला आहे.  विद्यार्थ्यांचे मुल्यमापन हे त्याच्या दैनंदीन जीवनात येणारे प्रश्न सोडवण्यच्या द्रष्टीने आवश्यक ज्ञानाच्या आधारीत शिक्षणाच्या तत्वावर (CBSE new assessment framework) करण्यात येणार आहे. हे बदल सहावी ते दहावी इयत्तेतील विज्ञान, गणित आणि इंग्रजी या तीन प्रमुख विषयांसाठी सुरू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय शिक्षणधोरणानुसार(National Education Policy - NEP) हा पुढाकार घेण्यात आला आहे.

केंद्रिय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी 24 मार्च 2021 रोजी ही CBSE new assessment framework लॉन्च केली. यानुसार विद्यार्थ्यांची घोकंपट्टी करण्याची सवय घालवण्यासाठी तसेच त्यांना व्यवहारिक ज्ञान आणि भविष्यात येणाऱ्या अडचणींवर उत्तरे शोधता यावीत यासाठी  क्षमता विकसीत करण्यावर भर देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत बदल करण्याचा उद्देश या संपुर्ण प्रक्रीयेत विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आधारित दृष्टीकोन ठेवण्यात आला आहे. 

काय आहे स्पर्धा आधारित दृष्टीकोन?

सध्या शालेय शिक्षण हे पुर्णपणे पाठ्यपुस्तकांवर आधिरीत आहे. मात्र पुस्तके बर्‍याचदा वास्तविक जगापेक्षा भिन्न असतात. स्पर्धात्मकतेवर आधारित दृष्टिकोन ठेवत मुलांना खर्‍या, वास्तव जगाशी जोडत त्यांचे शिक्षण देण्यात  येणार आहे. यामुळे त्यांची समस्या सोडवणे आणि विश्लेषणात्मक क्षमता वाढते. या मूल्यांकन फ्रेमवर्कमध्ये विज्ञान, गणित आणि इंग्रजी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील मदत करण्यात आली आहे. जेणेकरून ते मुलांना व्यावहारिक शिक्षणाकडे घेऊन जाऊ शकतात. विद्यार्थ्यांना दररोजच्या समस्या आणि उदाहरणांद्वारे हे विषय शिकवण्यात येतील. जेणेकरुन विद्यार्थी फक्त परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यास करणार नाहीत. त्याऐवजी त्या शिक्षणाद्वारे आपणास आपले जीवन, समाज आणि देशाच्या व्यावहारिक समस्येवर तोडगा देखील शोधू शकतील.

बदल कधी होणार?

प्रामुख्याने तीन विषयांच्या शिक्षण आणि मूल्यमापनाच्या पद्धतीत म्हणजेच परीक्षेत बदल होणार आहे. पुढच्या तीन ते चार वर्षात टप्प्याटप्प्याने हे बदल करण्यात येतील. केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि चंदिगढच्या केंद्रशासित प्रदेशातल्या शाळांमध्ये नवीन परीक्षा पद्धतींचा अवलंब केला जाईल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : कॉंग्रेसच्या समर्थनार्थ मतदारांची नावे वगळली- राहुल गांधीचा गंभीर आरोप

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT