CBSE 12th result eSakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE 12th result : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर! कुठे पाहता येईल? जाणून घ्या

CBSE XII Result : गेल्या वर्षीच्या तुलनेत पासिंग पर्सेंटेज वाढल्याचं दिसत आहे. तसंच यावर्षीही मुलांपेक्षा मुली वरचढ ठरल्या असल्याचं दिसत आहे.

Sudesh

CBSE Class 12 result : सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचं CBSE ने सांगितलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पासिंग पर्सेंटेज हे 0.65 टक्क्यांनी अधिक असल्याचं दिसत आहे. यावर्षी एकूण 91 टक्क्यांहून अधिक मुली पास झाल्या असून, मुलांच्या तुलनेत 6.40 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

कुठे पाहता येईल निकाल?

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही आपला निकाल पाहू शकता. cbse.nic.in, cbse.gov.in, cbsereults.nic.in आणि results.cbse.nic.in या वेबसाईट्सवर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येईल. तसंच काही वेळातच विद्यार्थ्यांचा निकाल हा डिजिलॉकरमध्ये देखील उपलब्ध होईल असं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे.

कसा पाहता येईल निकाल?

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर, स्कूल नंबर आणि Admit Card ID ची गरज भासेल. निकाल पाहण्यासाठी -

स्टेप-1 - सर्वात आधी वर दिलेल्या कोणत्याही अधिकृत वेबसाईटवर क्लिक करा.
स्टेप-2 -  यानंतर होम पेजवर जाऊन 12th Result या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप-3 -  त्यानंतर लॉगइन डीटेस्ल एंटर करुन पुढे प्रवेश करा.
स्टेप-4 -  यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. या निकालाची प्रिंट आऊट नक्की घ्या.

यावर्षी सुमारे 39 लाख विद्यार्थ्यांनी CBSE बारावी बोर्डाची परीक्षा दिली होती. सीबीएसईने यावर्षी देखील मेरिटमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर केलेली नाही. अनहेल्दी कॉम्पीटिशन टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT