CBSE
CBSE Sakal
एज्युकेशन जॉब्स

एकाच भागात परीक्षेचा ‘सीबीएसई’चा विचार

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न शाळांमध्ये दहावी, बारावीसाठी एकच वार्षिक परीक्षा घेण्यात येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. म्हणजेच या वर्गाच्या परीक्षा दोन भागांत घेतल्या जाणार नाहीत, असे शिक्षण मंत्रालयातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यास ‘सीबीएसई’ने दुजोरा दिलेला नाही.

कोरोना साथीमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘सीबीएसई’ने परीक्षा दोन भागांत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यात शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी पर्यायी मूल्यांकन पद्धती वापरून विद्यार्थ्यांचे गुणांकन केले गेले. कारण बोर्डाची परीक्षा होऊ शकली नाही. म्हणून या पद्धतीची अंमबजावणी करावी लागली होती. आता २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावी आणि बारावीचे शैक्षणिक सत्र आणि परीक्षा दोन टप्प्यांत विभागणार की नाही, हे अद्याप ठरवलेले नाही. याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे ‘सीबीएसई’च्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

‘सीबीएसई’च्या अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर केलेले नाही. परंतु त्यांनी म्हटले आहे, की शैक्षणिक सत्राचे विभाजन करणे, दोन सत्र परीक्षा घेणे हे २०२१-२२ मधील दहावी आणि बारावी वार्षिक परीक्षांसाठी विशेष मूल्यांकन योजनेचा भाग होते. त्याचा निर्णय कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला होता. आता हीच पद्धत नव्या शैक्षणिक सत्रात सुरू राहणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. नवीन शैक्षणिक वर्षांत हीच पद्धत वापरायची की नाही यावर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल.

दोन-भागात परीक्षा पद्धतीअंतर्गत पहिली सत्र परीक्षा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती आणि सत्र परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. परंतु दिल्लीत पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने अनेक शाळांनी सावध पवित्रा घेतला आहे. राजधानीतील काही शाळांनी वर्ग बंद ठेवण्याबाबतही सुरवात केली आहे. त्यामुळे ‘सीबीएसई’कडून मागील वर्षीच्या परीक्षा पद्धतीचा वापर केला जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT