CBSE Term 2 Exam 2022 esakal
एज्युकेशन जॉब्स

CBSE : १० वी आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाईन

सीबीएससीच्या परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले,‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्वांशी चर्चा करून ऑफलाईन परीक्षांचा निर्णय घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

सीबीएससीच्या परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले,‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्वांशी चर्चा करून ऑफलाईन परीक्षांचा निर्णय घेतला आहे.

पुणे - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएससी) (CBSE) इयत्ता १० वी (SSC) आणि १२ वीच्या (HSC) दुसऱ्या सत्रातील परीक्षा ऑफलाईन (Exam Offline) पद्धतीने आयोजित करण्यात येणार आहे. बुधवारी सीबीएससीच्या वतीने यासंबंधीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

सीबीएससीच्या परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज म्हणाले,‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने सर्वांशी चर्चा करून ऑफलाईन परीक्षांचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या सत्राची लेखी परीक्षा २६ एप्रिलपासून सुरू होणार आहे. त्यासंबंधीचे वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप नेहमीप्रमाणे असणार असून, नमुना प्रश्नपत्रिका सीबीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहे.’’

विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्रही मागील वर्षाप्रमाणे असणार असल्याचेही भारद्वाज म्हणाले. कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी परीक्षा घेता आल्या नाही. म्हणून पर्यायी मूल्यांकन पद्धतीचा अवलंब सीबीएससीने केला होता. त्यामुळे या वर्षी परीक्षा दोन सत्रात विभागण्यात आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये ऑफलाईन पद्धतीने प्रथम सत्राची परीक्षा घेण्यात आली होती.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ - https://www.cbse.gov.in/

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke: सरकारी शाळांसाठी किती निधी? किती पदे रिक्त? अभिजीत दीपकेंनी शिक्षण मंत्र्यांना विचारले ६ सवाल, माहिती देण्याचे आवाहन

रेल्वेच्या चादरी घेऊन बाजारात फिरले अन् कॅमेऱ्यात कैद झाले; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केली कारवाईची मागणी

IND vs SL 2nd Test: ध्रुव जुरेलची शतकी खेळी! भारताची पाचशे धावांच्या दिशेने वाटचाल; हार्दिक पांड्यानंतर असा पराक्रम करणारा पहिला

Marathi News Live Updates : परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी रशियातील मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली

झी मराठीवर येतेय नवी मालिका ‘धाकट्या सूनबाई’! प्रेमाची नवी गोष्ट लवकरच, कोण आहे नायिका?

SCROLL FOR NEXT