CBSE sakal media
एज्युकेशन जॉब्स

CBSE : दहावी, बारावी प्रथम सत्राच्या परीक्षा नोव्हेंबरमध्ये

संजीव भागवत

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी(SSC), बारावीच्या विद्यार्थ्यांची (HSC Students) प्रथम सत्र परीक्षा (First session exam) 15 नोव्हेंबरपासून ऑफलाईन (offline) पद्धतीने सुरू होणार आहेत. यासाठी लवकरच वेळापत्रक जाहीर (timetable announcement) केले जाणार असल्याची माहिती आज सीबीएसईकडून देण्यात आली.

शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील सीबीएसई बोर्डाची दहावी, बारावीची परीक्षा दोन टप्प्यांत होणार आहे. पहिले सत्र नोव्हेंबर-डिसेंबर २०२१ मध्ये होणार आहे. या महिन्यात परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक cbse.gov.in आणि cbse.nic.in या वेबसाईटवर जाहीर केले जाणार आहे. टर्म २ ची परीक्षा मार्च ते एप्रिल २०२२ दरम्यान घेतली जाणार आहे. टर्म १ परीक्षेचे आयोजन ४ ते ८ आठवड्यांमध्ये केले जाईल.

प्रथम सत्राच्या परीक्षेत मल्टीपल चॉईस प्रश्न विचारले जातील. या परीक्षेचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. प्रत्येक टर्ममध्ये ५० टक्के अभ्यासक्रमाचा समावेश असून बोर्डाच्या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थी सुधारित अभ्यासक्रम डाउनलोड करू शकतील, अशी माहिती सीबीएसईकडून देण्यात आली. तसेच दहावी आणि बारावीच्या कोणत्याही मुख्य विषयांची परीक्षा एकाच दिवशी होणार नाही, असेही सीबीएसईने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: निवृत्तीच्या आधी न्यायाधीशांनी नेमकं काय केलं? CJI सूर्यकांत यांनी व्यक्त केली चिंता, न्यायव्यवस्थेतही भ्रष्टाचार?

Gold Rate Today : सोन्याच्या भावात ऐतिहासिक उसळी, चांदीनेही मोडला विक्रम, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Ashes Test: नॅथन लायनमुळे चिडला Glenn McGrath; हात वर केले, फेकायला खूर्ची उचलली अन्... Video Viral

Code of Conduct : आचारसंहितेबाबत आयुक्तांचा इशारा; उल्लंघन केल्यास तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश

Delhi Pollution Restrictions : दिल्लीत आजपासून कडक निर्बंध, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, PUC शिवाय पेट्रोल मिळणार नाही

SCROLL FOR NEXT