Bank Jobs esakal
एज्युकेशन जॉब्स

Bank Jobs : दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ४८४ जागांवर भरती सुरू

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (CBI) मध्ये १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती सुरू झाली आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Central Bank of India Jobs : जर तुम्ही १० वी उत्तीर्ण असाल आणि तुम्हाला बॅंकेत नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया (CBI) मध्ये नुकतीच १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती सुरू झाली आहे.

'न्यूज १८ हिंदीने' या संदर्भात वृत्त दिले असून त्यानुसार, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये सब स्टाफ अर्थात सफाई कर्मचारी या पदांसाठी जागा निघाल्या आहेत. जर तुम्ही या जागांसाठी इच्छुक असाल तर सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या या Centralbankofindia.co.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

यासाठी सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारी पदांसाठी या जागा निघाल्या असून यासाठी इच्छुक असणारे उमेदवार ९ जानेवारी २०२४ किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकता.

या भरती अंतर्गत स्वच्छता कर्मचारी म्हणून सब स्टाफच्या एकूण ४८४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे, या जागांसाठी जे उमेदवार इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज भरावा.

उमेदवाराची पात्रता

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामधील सफाई कर्मचाऱ्यांच्या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेमधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराला स्थानिक भाषेचेही ज्ञान असणे आवश्यक आहे.

उमेदवारांची वयोमर्यादा

या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३१ मार्च २०२३ रोजी १८ ते २६ वर्ष या दरम्यान असावी. मात्र, सरकारी नियमांनुसार उमेदवारांना वयामध्ये सवलत देखील दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT