Maha CET Cell esakal
एज्युकेशन जॉब्स

CET Cell : बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशाची सीईटी सेलने मुदतवाढ द्यावी

बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संधी मिळावी, यासाठी केवळ दोन दिवसच मुदत दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यांसह विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची संधी उपलब्ध महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) उपलब्ध करून दिली आहे.

परंतु विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी केवळ शुक्रवारपर्यंतच मुदत असल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती अद्याप पोचलेली नाही. त्यामुळे सीईटी सेलने पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी,’ अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.

बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी संधी मिळावी, यासाठी केवळ दोन दिवसच मुदत दिली आहे. परंतु पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या आणि सीईटीत पात्र ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचली नसल्याचे निदर्शनास आले.

त्यामुळे हजारो विद्यार्थी पात्र ठरूनही प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपुऱ्या वेळेअभावी संस्थास्तरीय प्रवेश फेरीत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे, अशक्य आहे.

त्यामुळे संपूर्ण परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पुरेशी मुदतवाढ द्यावी,’ अशा मागणीचे निवेदन विविध संघटनांनी सीईटी सेलचे आयुक्त महेंद्र वारभूवन यांना दिले आहे.

महाराष्ट्र नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर,पुणे शहर काँग्रेसचे संघटक सचिव अभिजित महामुनी, भारतीय जनता पक्षाच्या कला व सांस्कृतिक आघाडीचे सरचिटणीस शैलेश बडदे यांनी एकत्रितरीत्या सीईटी सेलला हे निवेदन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT