admissions
admissions  sakal
एज्युकेशन जॉब्स

विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जात सुधारणा करण्यासाठी मुदतवाढ : सीईटी सेल

सकाळ वृत्तसेवा

Pune News : तीन वर्षाच्या विधी अभ्यासक्रमाच्या (Law Syllabus) ऑनलाइन अर्जात सुधारणा, बदल करण्यासाठी, तसेच कागदपत्रे अपलोड करण्यासाठी रविवारपर्यंत (ता.२६ ) मुदतवाढ दिल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (CET Cell) आयुक्त रवींद्र जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील शासकीय, शासकीय अनुदानित, अल्पसंख्याक, विद्यापीठ संचालित, विनाअनुदानित खासगी महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तीन वर्षाच्या विधी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेश प्रक्रियेतंर्गत ऑनलाइन अर्ज विद्यार्थ्यांकडून मागविण्याबाबत सूचना व प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

तीन वर्षाच्या विधी अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्जात सुधारणा, बदल करण्यासाठी आणि दस्ताएवज बदलण्यासाठी २६ डिसेंबरपर्यंत प्रवेश परीक्षा कक्षाने मुदतवाढ दिली आहे.

या विधी अभ्यासक्रमासाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका, वेळापत्रक यांचा अभ्यास करून ऑनलाइन अर्ज भरावेत. तसेच अभ्यासक्रम राबविणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मदत करावी. यापुढील सर्व सूचना प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील, असेही रवींद्र जगताप यांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा गोत्यात! भाजप मुद्दा पेटवणार, जयराम रमेश यांची सारवासारव

तासगाव-मणेराजुरी मार्गावर कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील 5 जण ठार

Latest Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात महिला मतदारांची बाजी

Share Market Today: आज शेअर बाजारात कोणते शेअर्स खरेदी कराल? कशी असेल बाजाराची स्थिती?

Cucumber Sandwich Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा काकडीचे चवदार सॅंडविच, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT