CTET exam
CTET exam esakal
एज्युकेशन जॉब्स

सीटीईटी परीक्षेत तांत्रिक अडचणींमुळे गोंधळ

मीनाक्षी गुरव

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (CBSE) घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत (CTET) यंदा तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. या परीक्षेच्या दुसऱ्या सत्रातील पेपर दोन तांत्रिक अडचणींमुळे नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाला. तर काही ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याने पेपर दोनची लिंक ओपन झाली नाही. त्यामुळे अनेक केंद्रांवर हा पेपर अचानकपणे रद्द करण्यात आले. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये (Student) गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

मंडळातर्फे सीटीईटी परीक्षेला गुरुवारपासून सुरवात झाली. या परीक्षेतील पहिला पेपर सकाळी साडे नऊ वाजता सुरू झाला. पहिला पेपर व्यवस्थित झाला. त्यानंतर दुपारच्या सत्रातील पेपर दोन अडीच वाजता सुरू होणार होता. उमेदवार परीक्षा केंद्रावर पोचले आणि परीक्षेसाठी ऑनलाइन लॉगिन केले. परंतु पेपर समोर (ओपन) येत नव्हता. परिणामी तांत्रिक अडचणी येऊ लागल्याने अनेक केंद्रांवर हा पेपर अर्धा-पाऊण तास उशिरा सुरू झाला. तर काही केंद्रावर तब्बल एक-दीड तास पेपर ओपन होत नव्हता. काही वेळाने आजचा हा पेपर रद्द झाल्याचे परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षार्थींना सांगितले. परंतु, अचानकपणे पेपर रद्द झाल्याचे सांगितल्याने परीक्षा केंद्रावर गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले, तर पेपर रद्द झाल्याचे कळाल्याने, उमेदवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत ‘सीबीएसई’च्या अधिकृत अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

‘‘शिवणे येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात सीटीईटी परीक्षेचे केंद्र होते. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेतील पहिला पेपर सुरळीत झाला. परंतु दुसरा पेपर (दुपारचे सत्र) दुपारी अडीच वाजता सुरू होणार होता. हा पेपर दुपारी साडे तीन वाजता सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर वारंवार तांत्रिक अडचणी येत होत्या, दरम्यान अर्ध्या तासाने परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले. शिक्षकांची परीक्षा घेण्यात केंद्रीय परीक्षा यंत्रणा नापास झाली आहे.’’

- अमोल दुसाने, उमेदवार

‘‘सीटीईटी परीक्षेचा पहिला पेपर व्यवस्थित झाला. परीक्षा यंत्रणेचे दुसऱ्या पेपरचे नियोजन पूर्ण कोलमडले. दुसरा पेपर दुपारी अडीच ते पाच या वेळात होणार होता. परंतु परीक्षा वेळेत सुरू न झाल्याने उमेदवारांची चिंता वाढली. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षेचे सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगितले. प्रत्यक्षात दुपारच्या सत्रातील पेपर साडे तीन वाजता सुरू झाला. पेपर सुरू झाल्यानंतर ४०-५० मिनिटांनी पेपर रद्द झाल्याचे केंद्रावरील अधिकारी सांगितले.’’

- संदीप निकम, उमेदवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Summer Health Care : उन्हाळ्यात अशक्तपणाचा वाढतोय धोका.! कसा करावा उष्माघातापासून बचाव ?

Sharad Pawar Poster: "चहावाल्याचे दुकान फक्त साखरवाला बंद करू शकतो...." पवारांच्या प्रचारसभेतील बोर्ड होताहेत तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT