CET Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

CET Exam : सीईटीचे संभाव्य वेळापत्रक घोषित

राज्यातील विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

सम्राट कदम

पुणे - राज्यातील विविध व्‍यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षांचे (सीईटी) संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवेशासाठी मार्च महिन्‍यापासून टप्प्‍याटप्प्‍याने विविध शिक्षणक्रमांच्‍या सीईटी परीक्षा घेतल्या जातील, असे सीईटी कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे.

सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेली एमएचटी-सीईटीची परीक्षा १६ एप्रिल ते ३० एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करता यावी, या उद्देशाने सीईटी सेलतर्फे सीईटी परीक्षांचे संभाव्‍य वेळापत्रक जाहीर केले जात असते. इयत्ता बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांच्‍या आधारे अनुक्रमे पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाते.

महत्त्वाच्या परीक्षा -

परीक्षेचे नाव - संभाव्य तारीख (वर्ष २०२४)

- बीएड.एम.एड. (तीन वर्ष) - २ मार्च

- एमएड सीईटी - २ मार्च

- एम.पी.ईडी. - ३ ते ३ मार्च

- बी.एड. (जनरल) - ४ ते ६ मार्च

- एमबीए/एमएमएस - ९ ते १० मार्च

- एमआर्च - ११ मार्च

- एम.एचएमसीटी - ११ मार्च

- एलएलबी तीन वर्ष - १२ ते १३ मार्च

- एमसीए - १४ मार्च

- एमएसटी-सीईटी - १६ ते ३० एप्रिल

- बीएससी नर्सिंग सीईटी - ५ मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सरकारकडून अपेक्षाच उरल्या नाहीत..., विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाणीवर राज ठाकरे चिडले

Student Protest: "आजच्या तरुणांना दडपणे अन् त्यांचे ब्रेनवॉश करणे, यशस्वी होणार नाही," भारतीय क्रिकेटपटूने सरकारला दाखवला आरसा

Latest Marathi News Live Update : CJP च्या शिष्टमंडळाची सरकारसोबतची बैठक संपली, नेमकी काय चर्चा झाली?

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

SCROLL FOR NEXT