change in entrance MHT CET exam  sakal
एज्युकेशन जॉब्स

‘एमएचटी सीईटी’ परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ‘सीईटी’ परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ‘सीईटी’ परीक्षेच्या नियोजित वेळापत्रकात बदल केला आहे.

त्यानुसार, अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र या अभ्यासक्रमांसह बी.एस्सी, नर्सिंग, विधी (पाच वर्ष) अशा विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकतेच जाहीर केले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) जवळपास २० अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘सीईटी’ परीक्षा घेतली जाते. त्यानुसार, शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वीच सीईटी सेलने जाहीर केले होते.

प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लानिंग आणि कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ‘एमएचटी सीईटी २०२४’ परीक्षा (पीसीबी/पीसीएम ग्रुप) १६ ते ३० एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार होती.

आता ‘एमएचटी-सीईटी’परीक्षेअंतर्गत पीसीबी ग्रुपची परीक्षा २२ ते ३० एप्रिल दरम्यान, तर पीसीएम ग्रुपची परीक्षा २ ते १६ मे या कालावधीत होणार आहे. यासह अन्य प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

तसेच ‘एमएएच-पीजीपी सीईटी, पीजीओ-सीईटी, एम.एस्सी-सीईटी’ या परीक्षांचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सीईटी सेलने अधिकृत संकेतस्थळाद्वारे जाहीर केले आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ :

www.mahacet.org

सीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक :

परीक्षा : कालावधी

एमएचटी-सीईटी : पीसीबी ग्रुप- २२,२३,२४,२८,२९, आणि ३० एप्रिल २०२४, पीसीएम ग्रुप- २,३,४,५,९,१०,११,१५ आणि १६ मे २०२४

एमएएच- एएसी सीईटी : १२ मे २०२४

एमएएच-बी.ए/बी.एस्सी बी.एड (चार वर्ष इंटिग्रेटेड कोर्स) : १७ मे

एमएएच-एलएलबी (पाच वर्ष) : १७ मे

एमएच- नर्सिंग सीईटी : १८ मे

एमएएच- बीएचएमसीटी सीईटी : २२ मे

एमएएच- बी.बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी : २७ ते २९ मे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagavi Water Crisis : पाणीटंचाईचं संकट! महाराष्ट्राकडून कर्नाटकला मिळणार का 2 TMC पाणी? मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवकुमार यांच्यात होणार महत्त्वाची चर्चा

Latest Marathi News Live Update : सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात

Noorjahan Mango: आंब्यांची ‘राणी’ ठरली महागडी! ३.३ किलोच्या नूरजहाँ आंब्याला ३,८०० रुपयांची किंमत, मध्य प्रदेशातील दुर्मीळ आंब्यास परदेशातही मागणी

US Iran Peace Deal : मध्यपूर्वेत शांततेची नवी पहाट ! अमेरिका-इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार; युद्धाला पूर्णविराम, 'होर्मुझ' खुली होणार

Operation Tiger: एकनाथ शिंदेंचा प्लॅन बिघडला? दोन खासदारांच्या भूमिकेमुळे 'ऑपरेशन टायगर' अडचणीत, सस्पेन्स कायम!

SCROLL FOR NEXT