home ministry job google
एज्युकेशन जॉब्स

केंद्रीय गृहमंत्रालयात अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याच्या नियमांत बदल

यापुढे अनुकंपा नोकरीसाठी अर्जदाराला कोणतीही अडचण येणार नाही. मृत अवलंबितांच्या अर्जावर गृह मंत्रालयातील उपसचिव/संचालक स्तरावरील तीन अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे विचार केला जाईल.

नमिता धुरी

मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या देण्याच्या नियमात बदल केले आहेत. पारदर्शक आणि न्याय्य प्रक्रिया अधिक बळकट झाली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने यासाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

या विभागाचे कल्याण अधिकारी मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करतील. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना वैयक्तिकरित्या बोलावून त्याला अनुकंपा तत्त्वावर नोकरी कशी मिळेल आणि त्याला कोणती कागदपत्रे आणावी लागतील हे सांगितले जाईल.

यापुढे अनुकंपा नोकरीसाठी अर्जदाराला कोणतीही अडचण येणार नाही. मृत अवलंबितांच्या अर्जावर गृह मंत्रालयातील उपसचिव/संचालक स्तरावरील तीन अधिकाऱ्यांच्या समितीद्वारे विचार केला जाईल. अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्यांची संख्या, मुलांचे वय आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन हे काम केले जाईल.

ही प्रक्रिया १०० गुणांमध्ये विभागली आहे. पहिले तीन आर्थिक मापदंड (वार्षिक पेन्शन, एकूण टर्मिनल लाभ आणि कमावत्या सदस्यांचे वार्षिक उत्पन्न) अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या एकूण संख्येमध्ये विभागले गेले आहेत.

दरडोई उत्पन्नाचा घटक लागू केल्यानंतर, टाय असल्यास, मृत अधिकाऱ्याच्या उर्वरित सेवेचा विचार केला जाऊ शकतो. मृत अधिकारी किंवा कर्मचार्‍यांचा सेवेचा कालावधी जितका जास्त असेल तितकेच कुटुंबाला अधिक महत्त्व दिले जाईल. जर सेवा कालावधी कमी असेल तर जास्त सेवा कालावधी असलेल्या अर्जदाराच्या तुलनेत त्याला/तिला कमी महत्त्व मिळेल.

अर्जदाराची शैक्षणिक पात्रता आणि अर्जदाराच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय मंत्रालय घेईल. नोकरी मिळवण्यासाठी प्रत्येकाला पारदर्शक प्रक्रियेतून जावे लागते. कोणाशीही भेदभाव होता कामा नये, याचीही काळजी घेतली जाईल. मृत अवलंबितांना धावपळ करावी लागू नये यासाठी विभागाचे कर्मचारी त्याला मदत करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT