CISCE Result 2024 esakal
एज्युकेशन जॉब्स

CISCE Exam Result : आयसीएसईचे ९९.४७ टक्के, तर आयएससीचे ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

सीआयएससीईचा दहावी-बारावीचा निकाल जाहीर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या आयसीएसईच्या (दहावी) परीक्षेत ९९.४७ टक्के, तर आयएससीच्या (बारावी) परीक्षेत ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आयसीएसईच्या निकालात ०.५३ टक्क्यांनी, तर आयएससीच्या निकालात १.२६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सीआयएससीईच्या भारतासह परदेशातील दोन हजार ६९५ शाळांमधील दोन लाख ४३ हजार ६१७ विद्यार्थ्यांनी यंदा आयसीएसईची परीक्षा दिली. त्यातील दोन लाख ४२ हजार ३२८ म्हणजेच ९९.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एकूण ९९ हजार ९०१ विद्यार्थ्यांनी आयएससी परीक्षा दिली, त्यातील ९८,०८८ म्हणजेच ९८.१९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बोर्डातर्फे आयसीएसई परीक्षा २१ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत घेण्यात आली. तब्बल ६० विषयांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली, त्यातील २० प्रादेशिक भाषांचे विषय, १३ परदेशी भाषांचे, तर एक क्लासिकल भाषेचा विषय होता. या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.३१ टक्के असून, विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९९.६५ टक्के इतकी आहे.

तर आयएससी परीक्षा १२ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत घेण्यात आली. या परीक्षेत ४७ विषय होते, त्यातही १२ प्रादेशिक भाषा, चार परदेशी भाषा आणि दोन क्लासिकल भाषा विषय होते. या परीक्षेत विद्यार्थिनींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९८.९२ टक्के असून, विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९७.५३ टक्के आहे.

महाराष्ट्रातून आयसीएसई परीक्षेसाठी २८ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातील ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर आयएससीची परीक्षा तीन हजार ८४० विद्यार्थ्यांनी दिली असून त्यातील ९९.७१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

परीक्षेच्या एकूण निकालाची आकडेवारी -

तपशील : परीक्षा दिलेले विद्यार्थी : विद्यार्थी : विद्यार्थिनी : उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी

आयसीएसई : २,४३,६१७ : १,३०,५०६ : १,१३,१११ : ९९.४७ टक्के

आयएससी : ९९,९०१ : ५२,७६५ : ४७,१३६ : ९८.१९ टक्के

महाराष्ट्रातील आयसीएसई आणि आयएससी परीक्षेचा निकाल -

परीक्षा : शाळांची संख्या : परीक्षा दिलेले विद्यार्थी : विद्यार्थी : विद्यार्थिनी : उत्तीर्णतेची टक्केवारी

आयसीएसई : २६५ : २८,५८८ : १५,४२५ : १३,१६३ : ९९.९६ टक्के

आयएससी : ७० : ३,८४० : १,७४३ : २,०९७ : ९९.७१ टक्के

शहरातील नामांकित शाळांचा निकाल -

- आयसीएसई आणि आयएससी परीक्षेत सेंट मेरीज शाळेमधील १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून आयसीएसई परीक्षेत नीती मनोत (९९.४ टक्के), निकिता सोंधी, सुहानी मलिक, तनिषा अजमेरा (९९.२ टक्के) आणि आयएससी परीक्षेत नीती देशपांडे (विज्ञान शाखा, ९८.८टक्के), ध्रुव पांड्ये (विज्ञान शाखा, ९८.३ टक्के), आदिती सावंत आणि आदिती रामकुमार (विज्ञान शाखा, ९७.८टक्के), अव्वल ठरले आहेत.

- वाकड येथील विज्डम वर्ल्ड स्कूलमधील १४१ पैकी १०३ विद्यार्थ्यांनी आयसीएसई परीक्षेत ९० टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. शाळेतील मानसी गुनसीलान (९९.६ टक्के), श्रुती नाबार (९९.२ टक्के), अतुल्य डोंगरे (९८.८ टक्के) विद्यार्थी अव्वल ठरले आहेत.

- आयसीएसई परीक्षेत विद्या प्रतिष्ठानच्या सिटी पब्लिक स्कूलमधील (मगरपट्टा) १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील कुशल अडसूळ (९९.६टक्के), हर्ष कुबेर (९९.२ टक्के), राशी गुप्ता आणि अनन्या जैन (९९ टक्के) विद्यार्थी अव्वल ठरले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT