Scholarship  Sakal
एज्युकेशन जॉब्स

Class 8 Scholarship : आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीची शिष्यवृत्ती परीक्षा १० डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेतील गुणांच्या आधारे पात्र विद्यार्थ्यांना इयत्ता नववी ते बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी ज्यांच्या पालकांचे उत्पन्न तीन लाख ५० हजारांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी योजनेसाठी पात्र आहेत. राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता आठवी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी परीक्षेस बसू शकतात.

तसेच विद्यार्थ्याला इयत्ता सातवीमध्ये किमान ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) मधील विद्यार्थ्यांनी किमान ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेले असावे, अशी माहिती परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिली.

विनाअनुदानित शाळेत, केंद्रीय विद्यालयात, जवाहर नवोदय विद्यालय, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी आणि सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इयत्ता नववी व अकरावी प्रथम संधीमध्ये उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता दहावीमध्ये किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे, असे ओक यांनी सांगितले.

महत्त्वाच्या तारखा

२३ ऑगस्ट ः ऑनलाइन पद्धतीने अर्जाची शेवटची मुदत

२ सप्टेंबर ः विलंब शुल्कासहीत अर्ज

१० डिसेंबर ः परीक्षा

फेब्रुवारी २०२४ ः परीक्षेचा निकाल

अर्जासाठी संकेतस्थळ ः https://www.mscepune.inhttps://nmmsmsce.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

NH 465 Expansion: अक्कलकोटला नवा विकासमार्ग: राष्ट्रीय महामार्ग 465 रुंदीकरणासाठी 740 कोटी

SCROLL FOR NEXT