Scholarship Google file photo
एज्युकेशन जॉब्स

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेच्या तारखेत पुन्हा बदल

- मीनाक्षी गुरव

पुणे : इयत्ता पाचवी आणि आठवीची आठ ऑगस्ट रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा नऊ ऑगस्टला होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे. आतापर्यंत या परीक्षेच्या तारखा तीन वेळा बदलण्यात आल्या आहेत. परीक्षेच्या तारखेत सातत्याने होत असलेले बदलामुळे फेब्रुवारीपासून परीक्षेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ताण मात्र वाढत असल्याचे दिसून येते.

या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४७ हजार ६१६ शाळांमधील तब्बल सहा लाख ३२ हजार ६६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. राज्यातील पाच हजार ६८७ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. ही शिष्यवृत्ती परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या रविवारी घेण्यात येते. परंतु यंदा एप्रिल महिन्यात घेण्याचा प्रस्ताव सुरवातीला परीक्षा परिषदेने राज्य सरकाला दिला होता. त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि परीक्षा २३ मे रोजी घेण्याचे निश्चित केले. दरम्यान कोरोनाचा संसर्ग आणि तांत्रिक कारणास्तव ही परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान २० जुलै रोजी जाहीर केलेल्या निर्णयानुसार या परीक्षेसाठी आठ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली. आता पुन्हा ही तारीख बदलली आहे. केंद्र सरकारमार्फत घेण्यात येणारी सेंट्रल आर्म पोलिस फोर्स या पदासाठीची लेखी परीक्षा राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आठ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. आता आठ ऑगस्ट ऐवजी नऊ ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र शाळांच्या लॉगिनमध्ये मंगळवारपासून उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही परिषदेने स्पष्ट केले आहे.

‘शिष्यवृत्ती परीक्षा २०२१’ :

  • - पाचवीच्या विद्यार्थ्यांची संख्या : ३,८८,४०५

  • - आठवीच्या विद्यार्थ्यांची संख्या : २,४४,२६२

  • - एकूण विद्यार्थी : ६,३२, ६६७

  • - शाळांची संख्या : ४७,६१६

  • - परीक्षा केंद्रांची संख्या : ५,६८७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT