class National Education Policy for students and parents Savitribai Phule Pune University on 6th April sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune News : विद्यार्थी व पालकांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा वर्ग

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ६ एप्रिल रोजी आयोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिक्षक आणि शैक्षणिक संस्थांसोबत पालक आणि विद्यार्थी हा देखील महत्वाचा घटक आहेत. त्यांच्यापर्यंत या बदलांची माहिती प्रभावीपणे पोहोचावी म्हणून गुरूवारी (ता.६) हा वर्ग आयोजित केल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिली.

विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, व्यवस्थापन परिषद सदस्य व कार्यक्रमाचे संयोजक रविंद्र शिंगणापूरकर, अंतर्गत गुणवत्ता आणि सिद्धता कक्षाचे संचालक डॉ.संजय ढोले आदी उपस्थित होते.

शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ही सर्वसमावेशक पद्धतीने प्रत्येक घटकाची बाजू, म्हणणे लक्षात घेऊन करण्यात यावी या उद्देशाने हा अभिनव प्रयोग विद्यापीठ करत असल्याचे डॉ. सोनवणे यांनी स्पष्ट केले. तर शिंगणापूरकर म्हणाले, ‘‘दुपारी ३ ते ५ या वेळेत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील संत ज्ञानेश्वर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.

विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या राज्य सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ.नितीन करमळकर, मुंबई विद्यापीठाचे प्र- कुलगुरू प्रा. डॉ.आर.डी.कुलकर्णी तसेच जळगावच्या एम.जे.महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.अनिल राव आदी यावेळी उपस्थित असतील. गुगल लिंकवर अर्ज करत पालक व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता.’’ ऑनलाईन पद्धतीनेही आपल्याला यात सहभाग नोंदविता येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinnar Bus Stand Accident Video : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकातच भीषण अपघात; वेगात आलेली बस थेट फलाटवर उभ्या प्रवाशांमध्ये घुसली

Neurologist Tips For Better Sleep: तुम्हालाही झोप येत नाही? न्यूरोलॉजिस्ट सांगतात ‘या’ 3 सवयी बदलल्या तर येईल शांत झोप

StudyRoom Live Sessions: १२ वी नंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी सुरू करावी? जाणून घ्या सकाळ+ स्टडीरूमचे खास लाईव्ह सेशनमध्ये

India Post App : रांगेत उभे राहण्याची गरज नाही! डाक विभागाचे 'डाक सेवा २.०' ॲप लॉन्च; सर्व टपाल सेवा आता एका क्लिकवर

Horoscope Prediction : उंदीर, वाघ की डुक्कर ! चायनीज ज्योतिषशास्त्रानुसार तुमची रास आणि स्वभाव घ्या जाणून

SCROLL FOR NEXT