COEP New Pattern for Changes Will create strategic blue print Dr Pramod Chaudhary Sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune : बदलांसाठी सीओईपीचा नवा पॅटर्न; धोरणात्मक ब्लू प्रिंट तयार करणार - डॉ. प्रमोद चौधरी

सीओईपी अभियांत्रिकीबरोबरच आता गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या मदतीने अर्थशास्त्रावर अभ्यासक्रम सुरू करणार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्याचे एकल विद्यापीठ म्हणून सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ उदयास येत आहे. त्यासाठी लागणारी नवी कार्यपद्धती, बलस्थाने आणि भविष्यातील वाटचालीची ब्लू प्रिंट तयार केली जाणार आहे, अशी माहिती नियामक मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

सीओईपीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेला कुलगुरू प्रा. सुधीर आगाशे, कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे, ‘केपीएमजी’चे नारायणन रामास्वामी उपस्थित होते. ‘केपीएमजी’ या जागतिक व्यवस्थापन सल्लागार संस्थेसोबत सीओईपीने करार केला. या वेळी चौधरी म्हणाले, ‘‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर मोठे बदल होत आहेत.

त्यादृष्टीने विद्यापीठ म्हणून सीओईपीची पुढील वाटचाल निश्चित करण्यात येत आहे. केपीएमजीने प्राध्यापकांच्या साथीत कामाला सुरवात केली आहे. विद्यापीठाची कार्यपद्धती, बलस्थाने, भविष्यातील लक्ष्य तसेच विद्यापीठासमोरील अडचणी व समस्या यांचा अभ्यास सुरू केला आहे. या सर्व बाबींचा अभ्यास वर्षाअखेरीस पूर्ण करून त्यावर कालबद्ध पद्धतीने प्राधान्यक्रम निश्चित करण्यात येईल. त्यानुसार उपाययोजना केल्या जातील.’’

याशिवाय विविध सल्लागार मंडळे आणि समित्यांची पुनर्रचना करणार आहे. विद्यापीठाचे नवीन संकुल चिखली येथे साकारण्यात येत आहे. तेथे संशोधनावर भर देऊ, अशी माहिती डॉ. आगाशे यांनी दिली.

नवे अभ्यासक्रम

सीओईपी अभियांत्रिकीबरोबरच आता गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या मदतीने अर्थशास्त्रावर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. येत्या काळात वैद्यकीय उपकरणशास्त्र, कृषीअभियांत्रिकी, सार्वजनिक धोरण निर्मितीसंदर्भात नवे विषयही सीओईपीत उपलब्ध केले जातील, अशी माहिती चौधरी यांनी दिली.

विद्यापीठाने याच शैक्षणिक वर्षापासून रोबोटीक्स-एआय, एमबीए इन बिझनेस अनॅलिटीक्समध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू केले. जगभरात सीओईपीचे ४५ हजार माजी विद्यार्थी आहेत. त्यांना विद्यापीठाशी जोडून घेण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणार आहे. आर्थिक मदतीबरोबरच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे म्हणून त्यांचे ज्ञान आणि अनुभव उपयोगात आणले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Price Today: फक्त 'या' कारणांमुळे सोन्याचे भाव कोसळले; आज काय आहे 24 कॅरेचा भाव?

Monsoon Kitchen Care: पावसाळ्यात स्वयंपाकघरातील दमटपणा कमी करायचाय? मग 'या' गोष्टी नक्की करा

Khadakwasla Dam: 1961 चा महापूर… पण खडकवासला धरण वाचलं कसं? अज्ञात इतिहास वाचा

Rain-Maharashtra Latest live news update: NDA कडून सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीचा अर्ज भरला

Asia Cup 2025 Explainer : श्रेयस अय्यरने आणखी काय करायला हवं? आगरकर म्हणाला, ना त्याची चूक, ना आमची...; मग दोष कुणाचा?

SCROLL FOR NEXT