एज्युकेशन जॉब्स

Cognizant करणार 1 लाख कर्मचाऱ्यांची भरती; भारतात 45 हजार फ्रेशर्सना संधी

सकाळ डिजिटल टीम

अमेरिकन आयटी कंपनी Cognizant या वर्षी जवळपास एक लाख लोकांना नोकरी देणार आहे.

न्यूयॉर्क - अमेरिकन आयटी कंपनी Cognizant या वर्षी जवळपास एक लाख लोकांना नोकरी देणार आहे. कॉग्निजेंटचे भारतात जवळपास 2 लाख कर्मचारी आहेत. या कंपनीचे आर्थिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे असते. कंपनीने सांगितलं की, जूनच्या तिमाहीमध्ये त्यांच्या एकूण उत्पन्नात 41.8 टक्के वाढ झाली असून ते 51.2 कोटी अमेरिकन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 3 हजार 800 कोटी रुपये इतकं झालं आहे. कंपनीने जून 2020 च्या तिमाहीत एकूण उत्पन्न 36.1 कोटी डॉलर्स इतकं होतं.

यंदा जूनच्या तिमाही अखेरपर्यंत कंपनीचे जवळपास 3 लाख कर्मचारी होते. कॉग्निजेंटचे सीईओ ब्रायन हम्फ्रीज यांनी सांगितलं की, आम्हाला वाटतं की, आम्ही 2021 मध्ये 1 लाख कर्मचाऱ्यांची भरती करू आणि 1 लाख असोसिएट्सना प्रशिक्षण देऊ. याशिवाय कॉग्निजेंट 2021 मध्ये 30 हजार फ्रेशर्स घेणार आहे तर भारतात 45 हजार फ्रेशर्सना घेण्याचा प्रस्ताव देण्याचा विचार करत आहे.

कॉग्निजेंटने आर्थिक वर्ष 2021 साठी उत्पन्न वृद्धीसाठीचं लक्ष्य वाढवून 10.2 ते 11.2 टक्के इतकं केलं आहे. या तिमाहीमध्ये कंपनीचं उत्पन्न 14.6 टक्के वाढून 4.6 अब्ज डॉलर इतकं झालं. जे एक वर्ष आधी याच कालावधीत चार अब्ज डॉलर होतं. कंपनीच्या अंदाजापेक्षा ही आकडेवारी जास्त आहे. कॉग्निजेंटने सीईओ ब्रायन हम्फ्रीज यांनी सांगितलं की, आम्ही दुसऱ्या तिमाहीत चांगली कमाई झाली. गुंतवणुकीच्या माध्यमातून आम्ही आमच्या कक्षा विस्तारत आहे.

तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करताना तो 4.69 ते 4.74 अब्ज डॉलर्स इतका सांगितला आहे. तर आर्थिक वर्ष 2021 चा वर्षभराचा अंदाज हा 18.4 ते 18.5 अब्ज अमेरिकन डॉलर इतका असेल असंही कंपनीने म्हटलं आहे.

कॉग्निजेंटचे मुख्य वित्तीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सेवांच्या कक्षा विस्तारण्यासाठी ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कर्मचारी भरती सुरु ठेवली असून त्यामध्ये कंपनी गुंतवणूक करत आहे. जूनच्या तिमाही अखेरपर्यंत कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या 3 लाखांपर्यंत पोहोचली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT